मराठी बातम्या /बातम्या /देश /

पाकिस्तानची कुटील चाल उघड; जम्मूत बॉर्डरजवळ सापडलं मोठं भुयार

पाकिस्तानची कुटील चाल उघड; जम्मूत बॉर्डरजवळ सापडलं मोठं भुयार

भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ तैनात BSF च्या जवानांना सीमेलगत भूमिगत भुयार खोदलेलं सापडलं आहे. संपूर्ण सीमेवर आता शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ तैनात BSF च्या जवानांना सीमेलगत भूमिगत भुयार खोदलेलं सापडलं आहे. संपूर्ण सीमेवर आता शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ तैनात BSF च्या जवानांना सीमेलगत भूमिगत भुयार खोदलेलं सापडलं आहे. संपूर्ण सीमेवर आता शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

    नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ तैनात BSF च्या जवानांना सीमेलगत भूमिगत भुयार सापडलं आहे.  यातून पाकिस्तानची भयंकर कुटील चाल उघडी पडली आहे. कराचीमध्ये तयार झाल्याची खूण असणारे पाईप आणि बंकरमध्ये असतात तशी वाळूची पोती या भुयारासाठी वापरले गेले आहेत. या नव्या शोधामुळे बॉर्डरवर तैनात जवानांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सीमाभाग पिंजून काढून घुसखोरांना हुडकून काढण्याचेही आदेश आहेत. या भुयाराचा वापर करून भारतात दहशतवादी किंवा शत्रूसैन्य घुसवण्याचा डाव पाकिस्तान रचत असल्याचा संशय आहे. मेड इन कराचीचा शिक्का असणारं सामान या भुयारात सापडलं आहे. सीमा सुरक्षा दलाचे सरसंचालक (BSF)राकेश अस्थाना यांनी डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा द्यायचे आदेश दिले आहेत. एकही घुसखोर भारतीय भूमीत प्रवेश करता कामा नये, यासाठी सर्वांना सतर्क राहण्यास त्यांनी सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत-पाक सीमेच्या कुंपणाजवळच जम्मू काश्मीरमध्ये हे मोठं भुयार खोदलेलं आढळलं आहे. सीमेलगत अशी आणखी छुपी भुयारं आहेत का याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. जम्मूच्या सांबा भागात पहारा देणाऱ्या BSF च्या टीमला 50 मीटर लांब खोदलेलं हे भूमिगत भुयार गुरुवारी दिसलं. या भुयाराच्या तोंडाशी 8-10 प्लॅस्टिकच्या गोण्या दिसल्या. त्यात वाळू भरलेली होती. कराची आणि शकरगढ असं या गोण्यांवर लिहिलेलं होतं. या गोण्यांवर तयार केल्याची तारीख आणि एक्स्पायरी डेटही कोरलेली आहे. त्यावरून ही सामग्री नुकतीच तयार झाल्याच उघड आहे. या भुयारापासून सुमारे 400 मीटरवर पाकिस्तानी पोस्ट आहे. त्यांनी तिथपासून हे भुयार खणलं असण्याची शक्यता आहे. BSF चे जवान संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमेलगत तैनात करण्यात आले आहेत. जम्मू, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांना लागून 3300 किमी लांब पाकिस्तान सीमा आहे. या सगळीकडेच अशा प्रकारे धोका निर्माण झालेला असू शकतो. हे लक्षात घेता या संपूर्ण सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. दहशतवादी, सशस्त्र सैन्य किंवा शस्त्रास्त्र भारतीय भूमीत पोहोचवण्याचा पाकिस्तानचा डाव उघडा पडला आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या