नवी दिल्ली, 3 एप्रिल: हवाई प्रवास करण्याऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता बॅगेजच्या (Baggage) कटीकटीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. इंडिगो (Indigo) या विमान कंपनीने प्रवाशांना डोअर-टू-डोअर सुविधा (door-to-door baggage transfer service) देण्याची तयारी सुरु केली आहे. आता इंडिगो कंपनी प्रवाशांच्या घरून सामान पिक करून प्रवास संपेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारणार आहे. विमान कंपनीने डोअर-टू-डोअर बॅगेज डिलीव्हरी देण्यासाठी ऑन डिमांड प्लॅटफॉर्म कार्टरपॉर्टरसोबत करार केला आहे. कंपनीने नवी दिल्ली आणि हैदराबादमध्ये 1 एप्रिलपासून सेवा सुरु केली आहे. लवकरच मुंबई आणि बेंगळुरुतही ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
कशा पद्धतीने ही प्रक्रिया असणार आहे? वाचा
इंडिगोने या डोअर-टू-डोअर सुविधेला 6EBagport हे नाव दिले आहे. यासाठी प्रवाशांना 24 तासापूर्वी बुकींग करावी लागेल. घरापासूनप्रस्थापित अंतरापर्यंत सामान पोहोचवण्याची जबाबदारी कंपनीची असेल. यामुळे प्रवाशांचा चेक इन काउंटर आणि सुरक्षा तपासासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. तसेच एखादी व्यक्ती ठराविक ठिकाणाऐवजी अचानक आलेल्या कामानिमित्त दूसरीकडे जावं लागलं. तरी त्यांना आपल्या सामानाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. ते सामान त्यांच्या नियोजित ठिकाणी व्यवस्थित पोहोचवलं जाणार आहे. यासाठी प्रवशांना 630 रुपये मोजावे लागलीत. यामुळे प्रवाशांना सामान सांभाळण्याची चिंता मिटणार आहे. अतिरिक्त सामान घेऊन जाण्याऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे.
स्वतःच्याच नादात दंग नर्सनं फोनवर बोलत-बोलत महिलेला दोनदा दिली कोरोना लस, पुढे जे घडलं ते अजबच
सामान विसरण्यापासून ते वजन उचलण्याच्या कटकटीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. त्यामुळे ही सुविधा इतर ठिकाणीही लवकरात लवकर सुरु व्हावी अशी मागणी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.