S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

अवकाशात पायलटनं शुट केला सॅटलाईट प्रक्षेपणाचा व्हिडीओ

'इस्रो'नं 1 एप्रिलला PSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण केले होते.

Updated On: Apr 2, 2019 10:04 AM IST

अवकाशात पायलटनं शुट केला सॅटलाईट प्रक्षेपणाचा व्हिडीओ

नवी दिल्ली, 2 एप्रिल : इंडिगो एअरलाईन्सच्या एका वैमानिकाचा एक गगनचुंबी व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने 1 एप्रिलला PSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण केले. या उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा व्हिडीओच चक्क या वैमानिकानं आपल्या कॉकपिटमधून शुट केला.



सोमवारी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 28 देशांचे उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी हे उपग्रह अवकाशात झेपावले. आज पाठवलेल्या 28 उपग्रहांमध्ये 24 अमेरिकेचे आहेत. 'इस्रो'ने PSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोने नवा विक्रम रचला आहे.

वैमानिक कॅप्टन मनोज कुमार चनन यांनी काढलेल्या या 44 सेकंदाच्या व्हिडीओ क्लिपमध्ये खिडकी बाहेर त्यांनी सहज PSLV चा लॉंच पाहिले आणि हा क्षण त्यांनी व्हिडीओत कैद केला.

'इस्रो'नं सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी पीएसएलव्ही सी 45 प्रक्षेपक एमीसॅट व 28 नॅनो उपग्रहांना घेऊन अवकाशात झेपावले. पीएसएलव्ही प्रक्षेपकाने चांद्रयान 2008 व मंगळ ऑर्बिटर 2013 या दोन्ही मोहिमांत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आज पाठवण्यात आलेल्या उपग्रहांमध्ये अमेरिकेतील 24, लिथुआनियातील 11 ,स्पेनमधील 1 तर स्वित्झर्लंडमधील एका उपग्रहाचा समावेश आहे.

मिळणार शत्रूच्या रडाराची माहिती

एमीसॅटमुळे संरक्षण विषयक मोठी माहिती देशाला मिळणार आहे. या उपग्रहामुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणाऱ्या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. या उपग्रहामुळे देशातील गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे. विशेष म्हणजे रात्रीच्यावेळी सुद्धा या उपग्रहाच्या माध्यमातून फोटो काढता येतील. तसेच शत्रूच्या भागात मोबाईल फोनसह अन्य किती संवाद उपकरणे सक्रीय आहेत ते सुरक्षा यंत्रणांना या उपग्रहामुळे कळणार आहे.


VIDEO पार्थ पवार पुन्हा वादात, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या 'फादर'ची घेतली भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: isro
First Published: Apr 2, 2019 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close