नवी दिल्ली 29 ऑक्टोबर : शुक्रवारी रात्री दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये आग लागली. विमानाने उड्डाण करताच प्रवाशांना विमानाच्या इंजिनमधून आगीच्या ठिणग्या उडताना दिसल्या. त्यानंतर घाईघाईत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E2131 या फ्लाइटमध्ये ही घटना घडली.
VIDEO - कोर्टातच 'दे दणादण'! महिला वकिलांचा तुफान राडा; न्यायाचं मंदिर बनलं कुस्तीचा आखाडा
इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असल्याचं सांगितलं आहे. वृत्तानुसार, IGIA नियंत्रण कक्षाला शुक्रवारी रात्री 10.08 वाजता दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E2131 च्या इंजिनमध्ये आग लागल्याचा कॉल आला. या विमानात 177 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्स होते. विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग लागली. यानंतर लगेचच विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
Scary visual of IndiGo 2131 Delhi to Bengluru Flight. Engine caught fire during take off. Full emergency declared at Delhi Airport; Passengers and Crew Safe. pic.twitter.com/d5tpvI9Hk7
— Siddhu Manchikanti (@SiDManchikanti) October 28, 2022
सध्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. हे विमान पुन्हा कधी उड्डाण करू शकेल, याबाबत स्पष्टता नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये विमान टेक ऑफ करण्यासाठी धावपट्टीवर धावत असताना अचानक काही ठिणग्या दिसतात आणि त्यानंतर आगीच्या ज्वाळांना सुरुवात होते. हे पाहताच पायलट धावपट्टीवरच विमान थांबवतो आणि सर्व लोकांना उतरवलं जातं.
Bhopal Gas Leak : गॅसगळतीने भोपाळ हादरले, अनेकजण रुग्णालयात, 90 च्या दशकाची आठवण
गेल्या काही महिन्यांत देशात अनेक वेळा विमानांचे इमर्जन्सी लँडिंग झाले आहे. बहुतेक घटना स्पाइसजेटसोबत घडल्या आहेत, पण आता इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांमध्येही तांत्रिक बिघाड दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी स्पाइसजेटच्या विमानातही असाच तांत्रिक बिघाड आढळून आला होता. स्पाइसजेटच्या विमानाने गोव्याहून हैदराबादला उड्डाण केले. हे विमान हैदराबादला पोहोचले होते आणि पायलट लँडिंगच्या तयारीत होते. मात्र त्यानंतर अचानक संपूर्ण विमान धुराने भरले. यामुळे पायलटला तातडीने इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी विमान कंपनीने त्यांना ऑक्सिजन मास्कही दिला नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.