हवेतच बंद पडत होते इंजिन, 'इंडिगो'च्या 47 विमानसेवा रद्द

विमानांतील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे डीजीसीएच्या आदेशानंतर इंडिगोने हा निर्णय घेतलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 13, 2018 01:15 PM IST

हवेतच बंद पडत होते इंजिन, 'इंडिगो'च्या 47 विमानसेवा रद्द

13 मार्च : इंडिगो एअरलाईन्सनं आज देशभरातील 47 विमानसेवा रद्द केल्या आहेत. विमानांतील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे डीजीसीएच्या आदेशानंतर इंडिगोने हा निर्णय घेतलाय.

इंडिगोच्या ए 320 या विमानात एक विशेष सीरीजचे प्रेट अँड व्हिटनी इंजन लावलेलं आहे. उड्डाण घेतल्यानंतर हे इंजन बंद पडत होते अशा अनेक तक्रारी आल्यात. मागील महिन्यातही तीन वेळा विमान आकाशात असताना इंजन बंद पडले होते. त्यानंतर डीजीसीएनं हा निर्णय घेतला.

इंडिगोच्या ए 320 नॅनो प्रकारच्या 8 विमानांच्या इंजिनमध्ये बिघाड आढळ्यामुळे तातडीनं ही आठ विमानं ग्राऊंड करण्यास सांगितली. म्हणजेच ही विमानं कधीच उड्डाण करू शकणार नाहीत. यामुळे मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बेंगलुरु, पटना, श्रीनगर, भुवनेश्वर, अमृतसर, गुवाहाटी आणि इतर शहरांमधल्या एकूण 47 विमानसेवा आज रद्द करण्यात आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 01:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...