पायलटच्या सर्तकतेमुळे वाचले 185 प्रवाशांचे प्राण, मुंबई-अहमदाबाद विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

इंडिगो एअरलाईन कंपनीचे विमानाची मोठी दुर्घटना आज टळली. मुंबई विमानतळावरून उड्डाण अचानक टायर फुटल्याने त्याचे अहमदाबाद विमानतळावर ईमर्जंसी लँडिंग करण्यात आले.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2018 10:54 PM IST

पायलटच्या सर्तकतेमुळे वाचले 185 प्रवाशांचे प्राण, मुंबई-अहमदाबाद विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

मुंबई, 19 सप्टेंबर : इंडिगो एअरलाईन कंपनीचे विमानाची मोठी दुर्घटना आज टळली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या विमानाचे चानक टायर फुटल्याने त्याचे अहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. पायलटच्या सर्तकतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून, विमानातील 185 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

मुंबई विमानतळावरून उड्डाण घेत असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळ फुटल्याने इंडिगो एअरलाईन कंपनीचे विमान बुधवारी सायंकाशी अहमदाबाद विमानतळावर सुरक्षिरित्या उतरविण्यात आले. 6E361, A320 मुंबई-अहमदाबाद या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने बुधवारी सायंकाळी मुंबईच्या विमानतळावरून उड्डाण घेतले. पण हे उड्डाण घेत असताना ही बाब वैमानिकाच्या लक्षात आली. त्याने तात्काळ अहमदाबादच्या एअर ट्राफिक कंट्रोल रूमला कळवून इमर्जन्सी लँडिंगची विनंती केली. ती तात्काळ त्यांनी मान्यही केली. अखेरिस सायंकाळी 7.21 वाजता त्या विमानाचे अहमदाबाद विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

या विमानात एखून 185 प्रवासी होते. लँडिंग होताच विमानतील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती सुत्रांनी दिली. घडल्या प्रकारानंतर हे विमान अहमदाबाद विमानतळावरच थांबवून ठेवण्यात आलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 आसाममध्ये गणेशोत्सवात रंगला अजिंक्य-शीतलचा डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2018 09:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...