...म्हणून दिल्ली- पुणे विमानाची इंदौरला करण्यात आली 'इर्मजन्सी लँडिंग'

...म्हणून दिल्ली- पुणे विमानाची इंदौरला करण्यात आली 'इर्मजन्सी लँडिंग'

इंडिगो 769 च्या पायलटने इंदौर येथील विमानतळावर याबद्दल माहिती देऊन इमरजन्सी लँडिंगची मान्यता मिळवली

  • Share this:

इंडिगो 769 हे विमान दिल्लीहून पुण्याला जाण्यासाठी निघाले. पण मार्गात सुरेश कुमार राणा या प्रवासाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे विमानाची तात्काळ इंदोरमध्ये इमरजन्सी लँडिंग करण्यात आली. सुरूवातीला विमानातील कर्मचाऱ्यांनी सुरेश यांना प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या तब्येतीत सुधार न दिसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरेश यांना इंदौर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत. इंडिगो 769 च्या पायलटने इंदौर येथील विमानतळावर याबद्दल माहिती देऊन इमरजन्सी लँडिंगची मान्यता मिळवली. तसेच विमानतळावर शक्य तितके वैद्यकीय सेवा उपलब्ध राहतील याचीही योग्य ती काळजी घेतली. इंडिगो कंपनीतर्फे सुरेशच्या घरच्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल कळवण्यात आले असून त्याचे कुटुंबिय त्वरीत इंदौरला सुरेशला भेटण्यासाठी रवाना झाले आहेत. इंडिगो 769 मधील कर्मचाऱ्यांनी नेमक्या वेळी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे सुरेश यांच्यावर इंदौरमध्ये उपचार होत आहेत.

First published: July 8, 2018, 11:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading