भारताच्या हल्ल्यानंतर पाकमध्ये वादळ, संसदेत 'इम्रान शेम शेम...' अशा घोषणा

इम्रान शेम शेम..' असं म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात त्यांच्या संसदेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 01:05 PM IST

भारताच्या हल्ल्यानंतर पाकमध्ये वादळ, संसदेत 'इम्रान शेम शेम...' अशा घोषणा

इस्लामाबाद, 26 फेब्रुवारी : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय वायूसेनेनं पाकव्याप्त काश्मिरात प्रवेश करत जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भारताने केलेल्या या पलटवाराचे पडसाद आता थेट पाकिस्तानच्या संसदेत उमटू लागले आहेत. 'इम्रान शेम शेम..' असं म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात त्यांच्या संसदेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासोबत पाकिस्तानी सैन्याचे 5 सैनिकही ठार करण्यात आल्याची माहिती आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. एएनआयनं याबद्दलची माहिती दिली आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.

भारतीय लढाऊ विमानांनी LoC पार करून पाकव्याप्त काश्मिरात प्रवेश केला आहे. भारताकडून 'जैश- ए- मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत अद्याप भारतीय वायूसेनेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच वायूसेनेकडून याबाबत माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.

सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचा विचार सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून भारताकडून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

Loading...

पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर 14 फेब्रुवारीला हल्ला झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं केलेल्या या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले.


IndiaStrikeBack : परराष्ट्र सचिवांची UNCUT पत्रकार परीषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...