• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • एकाच दिवशी दोन कोटींहून अधिक भारतीयांचं लसीकरण; 17 सप्टेंबरच्या विक्रमामागची गोष्ट

एकाच दिवशी दोन कोटींहून अधिक भारतीयांचं लसीकरण; 17 सप्टेंबरच्या विक्रमामागची गोष्ट

17 सप्टेंबर रोजी भारताने एकाच दिवशी दोन कोटींहून (2 Crore Plus Corona vaccination) अधिक जणांना लस देण्याचा नवा विक्रम केला.

  • Share this:
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: आज, 17 सप्टेंबर रोजी भारताने (India) एकाच दिवशी दोन कोटींहून (2 Crore Plus) अधिक जणांना लस देण्याचा नवा विक्रम केला. देशात कार्यरत असलेल्या जवळपास 1.10 लाख लसीकरण केंद्रांच्या (Vaccination Centres) माध्यमातून हा विक्रम साध्य करणं शक्य झालं आहे. यापूर्वीच्या सर्वाधिक लसीकरणाच्या दिवशी भारतात सुमारे 75 हजार लसीकरण केंद्रं कार्यरत होती. अन्य अनेक दिवशी या केंद्रांची संख्या सुमारे 50 हजारांच्या आसपास होती. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने न्यूज 18 ला दिलेल्या माहितीनुसार, 'आजच्या लसीकरण केंद्रांची संख्या ही याआधीच्या कार्यरत लसीकरण केंद्रांच्या संख्येच्या तुलनेत जवळपास दुप्पट होती.' महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 1.10 लाख लसीकरण केंद्रांपैकी केवळ सुमारे 3400 केंद्रं खासगी आहेत. बाकीची सर्व म्हणजे एक लाखाहून अधिक केंद्रं सरकारी आहेत. म्हणजेच हा लसीकरणाचा विक्रम साध्य करण्यात सरकारच्या प्रयत्नांचा वाटा मोठा आहे, हे यावरून सिद्ध झालं आहे. देशात कोविड लसीचा बूस्टर डोस?, आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट; म्हणाले... शक्य त्या सगळ्या ठिकाणी नवी लसीकरण केंद्रं सुरू करणं, लसीकरणासाठी आवश्यक त्या मूलभूत पायाभूत सुविधांची सोय, आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता, गावागावांत लसीकरण शिबिरं आयोजित करण्यासाठी विशेष बसेस सोडणं आदी प्रयत्नांचा यात समावेश होतो. बिहारमध्ये (Bihar) आज कार्यरत असलेल्या लसीकरण केंद्रांची संख्या सुमारे 14 हजार आहे. राज्य सरकारने एका दिवसात 30 लाख डोस देण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आज 50 हजारांहून अधिक वैद्यकीय कर्मचारी तैनात केले आहेत. आजच्या दिवसात आतापर्यंत बिहारमध्ये 20 लाख डोस देऊन झाले आहेत. कोरोना लढ्यात भारताची कमाल! 18 देशांना एकत्र जमलं नाही ते एकट्याने करून दाखवलं त्याखालोखाल उत्तर प्रदेशात (UP) आज सुमारे 13 हजार 400 लसीकरण केंद्रं कार्यरत असून, मध्य प्रदेशात (MP) 12 हजार 500, कर्नाटकात (Karnataka) सुमारे 12 हजार आणि गुजरात (Gujarat) राज्यात 9565 लसीकरण केंद्रं आज कार्यरत आहेत. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांनी आज प्रत्येकी 25 लाख डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. बिहारच्या खालोखाल ही पाच राज्यं आज झालेल्या लसीकरणाच्या संख्येत आघाडीवर असून, आजच्या दिवसात आतापर्यंत या राज्यांनी प्रत्येकी 15 लाख डोसेसचा टप्पा पार केला आहे. केंद्र सरकारमधल्या एका अधिकाऱ्याने न्यूज 18शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, ही पाचही राज्यं आज प्रत्येकी 20 ते 25 लाख लसीकरणाचा टप्पा गाठू शकतात. त्यामुळे देशातल्या आजच्या एकूण लसीकरणाची संख्या जवळपास अडीच ते तीन कोटींपर्यंत पोहोचेल. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी देशात 1.41 कोटी डोसेस देण्यात आले होते. त्याच्या दुप्पट आज दिले जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज त्या अधिकाऱ्याने वर्तवला.
First published: