नवी दिल्ली, 13 जुलै : भारताकडून 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा मुद्दा चीनने द्विपक्षीय चर्चेत उपस्थित केला आहे. सीमा विवाद यावर भारताशी सुरू असलेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान चीनने या गोष्टी उपस्थित केल्या आहेत.
या अॅप्सवर बंदी आणण्यासाठी भारताकडून सुरक्षेची कारणे दिली आहेत. याआधी चीनने केलेल्या या कारवाईला डब्ल्यूटीओ नियमांचे उल्लंघनही म्हटले गेले आहे.
भारत सरकारच्या सूत्रांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले आहे - दोन्ही देशांच्या मुत्सद्दी पातळीवरील चर्चेदरम्यान हा मुद्दा चीनच्या बाजूने उपस्थित करण्यात आला होता. चीन हे भारतीय नागरिकांच्या खासगी डेटामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे.
हे वाचा-क्रॅश झालं नाही गेहलोत सरकार; काँग्रेसमधील ही पाचजणं ठरली संकट मोचक
चिनी अॅप्सवर बंदी घालण्याची अमेरिकेचीही तयारी
याप्रकरणात अमेरिकेने चिनी अॅप्सद्वारे डेटा छेडछाडीचे आरोप देखील केले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की अमेरिका टिकटॉकसह चीनच्या सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालण्याचा निश्चितपणे विचार करीत आहे.
हे वाचा-Explainer : चीनचा मोठा प्लान; भूतानशी सीमा वाद, मात्र भारत लक्ष्य
त्यांनी अमेरिकन लोकांना चेतावणी दिली की जर त्यांना आपली वैयक्तिक माहिती चीनची कम्युनिस्ट पार्टीकडे सोपवायची नसेल तर त्यांनी टिकटॉकच्या वापराबाबत खबरदारी घ्यावी. अमेरिकेव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियातही टिकटॉकवर बंदी घालण्याबाबत चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.