भारतातला सर्वात जुना आईस्क्रीम ब्रँड वाडिलाल विक्रीला !

भारतातला सर्वात जुना आईस्क्रीम ब्रँड वाडिलाल विक्रीला !

वाडिलालचे शेअर्स शुक्रवारी 1,09,255 रुपयांवर बंद झाले आणि कंपनीचे बाजारमूल्य 740 कोटी रुपये राहिलं.

  • Share this:

20 नोव्हेंबर : भारतातला सर्वात जुना 'वाडिलाल' आइस्क्रीम आता अखेरच्या घटका मोजत आहे. वाडिलाल समुहाने आपला हा 8 दशक जुना ब्रँड विक्रीसाठी काढलाय.

अहमदाबादच्या 8 दशक जुनी कंपनी वाडिलालवर गांधी कुटुंबीयांचा मालकी हक्क आहे. पण आता या कंपनीच्या प्रमोटर्सनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रोजेन फूड सेगमेंटमध्ये वाडिलालचा सगळ्यात मोठा हिस्सा आहे. तसंच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीचे 64 टक्के शेअर हे त्यांच्या प्रमोटर्सकडे आहेत. वाडिलालने लिंकन इंटरनॅशनलला इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून निवड केली आहे.

ही कंपनी त्यांच्या वतीने संभाव्य खरेदीदारांशी संपर्क साधेल.  कंपनीचे व्हॅल्युएशनचा निर्णय आणि किती हिस्सेदारी विकायची हा निर्णय कंपनीचे प्रमोटर्स कंपनीच्या खरेदीदारवर ठरवणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, वाडिलाल इंडस्ट्रीमध्ये 60 टक्के हिस्सेदारीसाठी प्रमोटर्स 600 कोटींची अपेक्षा करत आहे. सध्यातरी कंपनीतले वीरेंद्र गांधी बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत, त्यांची कंपनीत सगळ्यात जास्त हिस्सेदारी आहे, ते त्यांचे शेअर आता विकू शकतात.

 

कंपनीच्या प्रमोटर्सकडे 'इतके' शेअर होते.

सप्टेंबर 2017 पर्यंत वाडिलालमधील प्रमोटर्सचा हिस्सा 64.80 टक्के होता, म्हणजे त्यांच्याकडे 46,60,370 शेअर्स होते.

यातील वीरेंद्र गांधीकडे 2,78,333 शेअर्स होते. राजेश गांधीकडे 29, 0132 आणि त्यांचा चुलत भाऊ देवांशुकडे 34,1450 शेअर्स होते.

उर्वरित भाग हे कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे होता.

2016-17 या आर्थिक वर्षात कंपनीला 16.33 कोटींचा नफा झाला होता आणि एकूण उत्पन्न 482.34 कोटी रुपये होते.

वाडिलालचे शेअर्स शुक्रवारी 1,09,255 रुपयांवर बंद झाले आणि कंपनीचे बाजारमूल्य 740 कोटी रुपये राहिलं.  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 09:33 PM IST

ताज्या बातम्या