मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशात येणार आता पाण्यावरून चालणारं विमान, मोदींनी केली होती पहिली राईड

देशात येणार आता पाण्यावरून चालणारं विमान, मोदींनी केली होती पहिली राईड

देशात अशा प्रकारचे 16 मार्ग निवडण्यात आले आहे. त्यातला पहिला प्रयोग गुजरातमध्ये होणार आहे. गुवाहाटी, अंदमान निकोबार आणि यमुना ते उत्तराखंड  अशा मार्गांवरही ही सेवा सुरू होईल.

  • Published by:  Ajay Kautikwar
नवी दिल्ली 25 ऑक्टोबर: भारतात आता लवकरच सी प्लेनची (Sea Plane)  सुरुवात होणार आहे. भारतातली ही पहिलीच सेवा असून 31 ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होणार आहे. साबरमती रिव्हररफ्रंट (Sabarmati Riverfront) ते स्टॅच्यू ऑफ यूनिटी (Statue of Unity) दरम्यान ही सेवा असणार आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांनी ही माहिती दिली. स्पाइसजेट कंपनी मालदीववरून यासाठी एक सीप्लेन खरीद केलं आहे. 26 ऑक्टोबरला हे विमान भारतात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा या विमानातून पहिली राईड घेतली होती. 250 किलोमीटर परिसरात हे विमान सेवा देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमती रिव्हर फ्रंट ते अहमदाबाद असा प्रवास या सीप्लेनमधून गेले होते. साबरमतीच्या पाण्यावरून हे विमान उड्णान घेणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही सेवा सुरू केली जणार आहे. ही सेवा प्रदुषण कमी करणारी असून पूर्ण सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली. देशात अशा प्रकारचे 16 मार्ग निवडण्यात आले आहे. त्यातला पहिला प्रयोग गुजरातमध्ये होणार आहे. गुवाहाटी, अंदमान निकोबार आणि यमुना ते उत्तराखंड  अशा मार्गांवरही ही सेवा सुरू होईल. बिहारला मोफत लस, उरलेला देश पाकिस्तान आहे की बांग्लादेश? - मुख्यमंत्री जगातला सर्वात उंच पुतळा असलेलं स्टॅच्यू ऑफ यूनिटी (Statue of Unity) हे सरदार वल्लभ भाई पटेल यांचं स्मारक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे काम सुरू केलं होतं. हे स्मारक जागतिक पर्यंटन केंद्र व्हावं असा सरकारकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक अभिनव उपक्रम राबविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
First published:

Tags: Narendra modi

पुढील बातम्या