भारताच्या पहिल्या खासगी चांद्रयानाची मार्चमध्ये गगनभरारी!

भारताच्या पहिल्या खासगी चांद्रयानाची मार्चमध्ये गगनभरारी!

मार्च महिन्यात बंगळुरूची एक कंपनी ही गगनभरारी घेणार आहे. भारतातलं पहिलं खासगी चांद्रयान मार्चमध्ये उड्डाण करणार आहे.

  • Share this:

28 डिसेंबर : इस्रोच्या चांद्रयानाबाबत आपल्या सर्वांनाच अभिमान वाटतो. पण तुम्ही कधी एका खासगी कंपनी आपलं यान चंद्रावर पाठवणार असल्याचं ऐकलंय का? होय, पण हे खरं आहे. मार्च महिन्यात बंगळुरूची एक कंपनी ही गगनभरारी घेणार आहे. भारतातलं पहिलं खासगी चांद्रयान मार्चमध्ये उड्डाण करणार आहे.

या पहिल्या खासगी चांद्रयानाची उंची २ मीटर आणि सहाशे किलो वजनाचं हे यान आहे. या यानाचं जीवनमान २४ दिवस असणार आहे. चंद्रावरची अधिक माहिती गोळा करणं, हाय डेफिनिशन छायाचित्र टिपणं, हा या खासगी चांद्रयान मोहिमेचा हेतू आहे. अंतराळ विज्ञान कंपनी इंडसचा हा उपक्रम आहे. इस्रोच्या निवृत्त शास्त्रज्ञांनीही या टीमला बरीच मदत केली आहे.

ही आहेत पहिल्या खासगी 'चांद्रयान'ची वैशिष्ट्य

- हे यान 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास करणार

- उंची - 2 मीटर आहे.

- वजन - 600 किलो आहे.

- हाय-डेफिनिशन कॅमेरानं कार्यरत आहे.

- माहिती संकलित करण्यासाठी 4 केंद्र आहेत.

First published: December 28, 2017, 9:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading