Home /News /national /

ISRO 2020 गगनयान मिशन : भारत पहिल्यांदाच अंतराळात माणूस पाठवणार; कोण असतील पहिले भारतीय अंतराळवीर?

ISRO 2020 गगनयान मिशन : भारत पहिल्यांदाच अंतराळात माणूस पाठवणार; कोण असतील पहिले भारतीय अंतराळवीर?

ISRO च्या चांद्रयान 3 कडे तर साऱ्या जगाचे डोळे आहेतच, पण त्याच बरोबरीने नव्या वर्षात भारत पहिल्यांदाच अंतराळात मानव पाठवणार आहे. या गगनयान मोहिमेसाठी 4 भारतीयांची अंतराळवीर म्हणून निवड झाली आहे.

    बंगळुरू, 1 जानेवारी : नवीन वर्ष भारताच्या स्पेस मिशनसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. ISRO च्या मिशन चांद्रयान 2 नंतर आता चांद्रयान 3 कडे तर साऱ्या जगाचे डोळे आहेतच, पण त्याच बरोबरीने नव्या वर्षात भारत पहिल्यांदाच अंतराळात मानव पाठवणार आहे. या Human Spaceflight मिशनचं नाव गगनयान (Gaganyaan) आहे. गगनयानसंदर्भात महत्त्वाची माहिती ISRO चे प्रमुख के. सिवन यांनी दिली. भारताकडून पहिल्यांदा अंतराळात पाऊल टाकण्याची संधी कुणाला मिळणार हे यातून उघड झालं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) साठी 2020 हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारताचं पहिलं मानवी अंतराळ मिशन यावर्षात साकारणार आहे. जगातले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या देशांनी यशस्वीपणे मॅन मिशन पार पाडलं आहे. आता गगनयानच्या माध्यमातून भारताकडूनही अंतराळात माणूस पाठवणार येणार आहे. त्यासाठी भारतीय हवाईदलातल्या (Indian Air Force) चौघांची निवड करण्यात आली आहे. त्यांना रशियात गगनयान मिशनसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती सिवन यांनी दिली. संबंधित - नव्या वर्षात इस्रोकडून गोड बातमी! चांद्रयान 3 ला सरकारने दिली मंजुरी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात गगनयानसाठी प्रशिक्षण सुरू होईल. भारताकडून अंतराळात पाऊल टाकणाऱ्या चार जणांना त्यासाठी रशियात पाठवण्यात येईल, असं सिवन यांनी सांगितलं. पण या पहिल्या भारतीय अंतराळवीरांची नावं त्यांनी अद्याप उघड केलेली नाहीत. 'इस्रो'च्या चांद्रयान 3 मोहिमेला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती इस्रोप्रमुख के सिवन यांनी सांगितलं आहे. चांद्रयान 2 मध्ये चांगलं काम सुरू आहे. विक्रम लँडरला जरी अपेक्षित यश मिळालं नसलं तरी ऑर्बिटर काम करत आहे. पुढच्या 7 वर्षांपर्यंत आपल्याला माहिती पाठवत राहील असंही त्यांनी सांगितलं. चांद्रयान मोहिमेसाठी तयारी सुरू करण्यात आल्याचंही के सिवन यांनी सांगितले. ते म्हणाले की, दुसऱ्या स्पेस पोर्टसाठी जमीन संपादित करण्यात आली असून थूटुकुडी इथं उभारणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. -------------------------------- अन्य बातम्या आश्चर्य...कोकणातल्या जंगलात दुर्मिळ 'वनमानव', वाचून थक्क व्हाल थक्क VIDEO : हा छोटा बघा हाताच्या मदतीने काढतो धावा, साक्षात सचिनही झाला थक्क! VIDEO : एकता कपूरनं केली Naagin 5 ची घोषणा, पाण्यात घेतली ऑडिशन 602 नको रे बाबा! मंत्रालयातील एका दालनाबद्दलच्या अफवेमुळं मंत्र्यांना भीती
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Isro

    पुढील बातम्या