S M L

भारतातले 'इतके' अतिश्रीमंत व्यक्ती परदेशी झाले स्थायिक!

देशातून अतिश्रीमंत व्यक्ती बाहेर जाण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Sachin Salve | Updated On: Feb 5, 2018 10:06 AM IST

भारतातले 'इतके' अतिश्रीमंत व्यक्ती परदेशी झाले स्थायिक!

05 फेब्रुवारी : देशातून अतिश्रीमंत व्यक्ती बाहेर जाण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीनसारख्या देशातूनही मोठ्या प्रमाणावर अतिश्रीमंत परदेशांत स्थायिक होत आहेत. त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो आहे.

२०१७मध्ये एकूण सात हजार अतिश्रीमंतांनी भारत सोडून परदेशांत स्थायिक होण्याला पसंती दिली आहे. न्यू वर्ल्ड वेल्थ अहवालानुसार २०१६पेक्षा हे प्रमाण १६ टक्के अधिक आहे.

या अहवालानुसार, २०१६मध्ये सहा हजार अतिश्रीमंतांनी त्यांचा अधिवास (डोमिसाइल) परदेशात नेला होता. २०१५मध्ये ही संख्या चार हजार होती. मात्र २०१७मध्ये ती सात हजार झाली. या तुलनेत २०१७मध्ये चीनमधून १० हजार अतिश्रीमंत देशाबाहेर स्थायिक झाले. देशाबाहेर स्थायिक होताना अतिश्रीमंतांनी अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांना पसंती दिली आहे.

चिनी अतिश्रीमंतांनी अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलिया या देशांना पसंती दिली आहे.

भारत व चीन येथून अतिश्रीमंत बाहेर स्थायिक होण्यासाठी जात असले तरी या देशांसाठी ही चिंतेची बाब नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे दोन्ही देश मोठ्या प्रमाणावर अतिश्रीमंत तयार करत असल्यामुळे स्थलांतर दिसून येत नसल्याकडे अहवालाने लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही देशांत राहणीमानात सुधारणा झाल्यास देशाबाहेर गेलेले नागरिक पुन्हा देशात येतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2018 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close