• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली : रघुराम राजन

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली : रघुराम राजन

RBI Governor Raghuram Rajan at FIBAC Banking conference in at Trident Nariman Point, Mumbai on Tuesday. Express Photo 16/8/16
 *** Local Caption *** RBI Governor Raghuram Rajan at FIBAC Banking conference in at Trident Nariman Point, Mumbai on Tuesday.

RBI Governor Raghuram Rajan at FIBAC Banking conference in at Trident Nariman Point, Mumbai on Tuesday. Express Photo 16/8/16 *** Local Caption *** RBI Governor Raghuram Rajan at FIBAC Banking conference in at Trident Nariman Point, Mumbai on Tuesday.

देशाची गरज लक्षात घेता सात टक्के विकासदर हा पुरेसा नसल्याचं मतही राजन यांनी व्यक्त केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 नोव्हेंबर : ‘नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावला,’ असं म्हणत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडलं आहे. देशाची गरज लक्षात घेता सात टक्के विकासदर हा पुरेसा नसल्याचं मतही राजन यांनी व्यक्त केलं आहे. ‘देशाची अर्थव्यवस्था 2012 ते 2016 या काळात वेगाने वाढत होती. मात्र जीएसटी आणि नोटाबंदीच्या निर्णयाने या वाढीला ब्रेक लागला,’ असं निरीक्षण रघुराम राजन यांनी नोंदवलं आहे. रघुराम राजन हे कॅलिफोर्निया विद्यापीठातील ‘भारताचे भविष्य’ या कार्यक्रमात बोलत होते. ‘पुतळे वेळेत बनवता, इतर कामांचं काय?’ ‘भारतात पुतळे वेळेवर बनवले जातात. अशीच इच्छाशक्ती इतर कामांत का दाखवली जात नाही,’ असा सवाल करत रघुराम राजन यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘पंतप्रधान कार्यालयाकडूनच अनेक निर्णय घेतले जात आहेत. जोपर्यंत पंतप्रधान कार्यालयाची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत कोणीही निर्णय घेत नाही,’ असंही राजन म्हणाले. अर्थमंत्री जेटलींकडून स्पष्टीकरण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं आहे. ‘या निर्णयांमुळे मोठी आपत्ती येईल, अशी भविष्यवाणी वर्तवणारे लोक चुकीचे ठरले आहेत. करामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, हे मागील दोन वर्षांच्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय,’ असं जेटली म्हणाले. VIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण
  First published: