Home /News /national /

Global Economic Freedom Indexमध्ये भारताची घसरण, 26 वरून थेट 105वा क्रमांक!

Global Economic Freedom Indexमध्ये भारताची घसरण, 26 वरून थेट 105वा क्रमांक!

सिंगापूर आणि हाँगकाँगसारखे छोटे देश यात आघाडीवर आहेत. वर्षभरात अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली 11 सप्टेंबर: जगभरातल्या उद्योगांना आकर्षीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. भारत जगाचं प्रॉडक्शन हब होण्याचा प्रयत्न करतो आहे असे दावे सरकारकडू वारंवार करण्यात येत असतात. मात्र कॅनडातल्या एका संस्थेने केलेल्या अभ्या पाहणीत भारताचं स्थान घसरलं आहे. कॅनडातल्या फ्रेजर इन्स्टिटयूटने Global Economic Freedom Index तयार केला आहे. त्यात भारताचं स्थान घसरलं असून ते 26 वरून थेट 105व्या क्रमांकावर गेलं आहे. देशात उद्योग वाढीसाठी, नव्या उद्योगांसाठी वातावरण कसं आहे, पायभूत सुविधा, कर रचना, परवाना मिळविण्यासाठी लागणारा वेळ अशा सगळ्या घटकांचा विचार करून यात क्रमवारी देण्यात आली आहे. या अहवालात 162 देश असून गेल्या वर्षी भारताचा क्रमांक 79 होता. सिंगापूर आणि हाँगकाँगसारखे छोटे देश यात आघाडीवर आहेत. वर्षभरात अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. कोरोनामुळे गेल्या 6 महिन्यांमध्ये अर्थ आणि उद्योग विश्वाला मोठा धक्का बसला आहे. सगळीच व्यवस्था कोलमडल्याने प्रचंड मोठा फटका आहे. हा अहवाल आलेला असतांनाच देशासाठी दिलासा देणारी बातमीही आली आहे. चीनचा मुजोरपणा सुरूच, सीमेवर पुन्हा सैन्यांची जमवाजमव जगातली सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या Appleने चीनमधून भारतात तब्बल 8 फॅक्ट्री स्थानांतरीत केल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. प्रसाद हे जगभरात असलेल्या बिहारच्या नागरीकांशी संवाद साधत होते. त्यावेळी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, भारत आता जगाचं प्रॉडक्शन हब म्हणून उदयास येत आहे. बदलत्या परिस्थितीचा संधी म्हणून उपयोग करून भारत फायदा करून घेणार आहे. 'कोरोना व्हायरसचा नाश झाला', देशात COVID-19 चा प्रकोप होत असताना भाजप नेता बरळला भारताला चीन (China), अमेरिका (US), ब्रिटेन (UK), जापान (Japan) आणि ऑस्ट्रेलिया (Austrailia) या देशांचं समर्थन मिळालं आहे असंही त्यांनी सांगितलं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या