भारतातील सर्वात मोठी बातमी, 270 प्रवाशांचे जीव धोक्यात; कोरोनाग्रस्त परदेशी नागरिक शिरला विमानात

भारतातील सर्वात मोठी बातमी, 270 प्रवाशांचे जीव धोक्यात; कोरोनाग्रस्त परदेशी नागरिक शिरला विमानात

कोरोनाग्रस्त परदेशी नागरिकाने 270 प्रवासी असलेल्या विमानात प्रवेश केल्याने इतर प्रवासी धोक्याच्या सावटाखाली आले आहेत

  • Share this:

मुन्नार, 15 मार्च : कोरोनाग्रस्त किंवा संशयित रुग्णांना वेगळं ठेवण्यात य़ेत आहे. या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी याबाबत दिलेल्या नियमावलींच पालन करणं आवश्यक आहे. मात्र कोरोनाबाबतच्या (Coronavirus) नियमावलींचं उल्लंघन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

केरळ येथील एका रिसोर्टमध्ये house quarantine मध्ये असलेल्या एका परदेशी नागरिकाने कोची एअरपोर्टहून (kochi Airport) सुटणाऱ्या आतंरराष्ट्रीय विमानात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे विमानातील सर्व प्रवासी धोक्याच्या सावटाखाली आले आहेत. रिसाॅर्टपासून विमानतळ तब्बल 100 किमी अंतरावर आहे. अशा परिस्थितीत तो कोरोनाग्रस्त परदेशी नागरिक विमानतळापर्यंत पोहोचला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही वेळापूर्वीच या परदेशी नागरिकाची कोविड – 19 (Covid - 19) ची तपासणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर कोची विमानतळातील अधिकाऱ्यांनी विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवले. United Kingdom चा मूळ रहिवासी असलेला हा प्रवासी quarantine मध्ये होता. या परदेशी नागरिकाने तब्बल 270 प्रवासी असलेल्या विमानात प्रवेश केल्याने एकच गोंधळ उडाला आहे. The Emirates चे हे विमान कोचीहून दुबईसाठी सुटणार होते. Quarantine मध्ये असलेल्या या नागरिकाने रिसाॅर्टपासून 100 किमी अंतरावर असलेल्या विमानतळापर्यंतचा प्रवास कसा केला? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. इडुकी येथील प्रसिद्ध हिल स्टेशन मुन्नार येथे पर्यटनासाठी आलेल्या 19 जणांच्या ग्रुपमधील तो एक पर्यटक आहे. हा ग्रुप मुन्नार टी कन्ट्री रिसोर्ट येथे मार्चच्या 7 तारखेपासून राहत (house quarantine ) आहे.

संबंधित - 11 रुपयांत बचावाची गॅरेंटी देत होता कोरोना बाबा, पोलिसांनी केली तुरुंगात रवानगी

या परदेशी नागरिकाच्या चाचणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब अधिकारी त्याला सांगण्यासाठी त्याच्या रुममध्ये जाण्यापूर्वीच तो तेथून निघून गेला होता, असे मंत्री व्ही. एस. कुमार यांनी एका टिव्ही चॅनलला सांगितले.

परदेशी नागरिकाने विमानात प्रवेश केल्याने त्यावेळी असलेल्या 270 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात चाचणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता हा परदेशी नागरिक रिसॉर्टमधून बाहेर पडला. याबाबत अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी पुढील कारवाई करीत विमानातील नागरिकांच्य़ा सुरक्षेसाठी उपयायोजना केल्या आहेत.

संबंधित - कोरोनाचा कहर, मुलाने हॉस्पिटलच्या खिडकीतून पाहिलं वडिलांचं शव

First published: March 15, 2020, 1:28 PM IST

ताज्या बातम्या