Lockdown च्या काळात Network18 दररोज 19 कोटी लोकांपर्यंत पोहोचलं

Lockdown च्या काळात Network18 दररोज 19 कोटी लोकांपर्यंत पोहोचलं

21 ते 27 मार्च या कालावधीत Network18 च्या चॅनेल्सनी भारतीय टीव्ही क्षेत्रात वर्चस्व गाजवलं. 42 कोटी दर्शक या काळात नेटवर्कची चॅनेल्स पाहात होते.

  • Share this:

मुंबई, 2 एप्रिल : Network18 ची टीव्ही चॅनेल्स 19 कोटींच्या वर लोकांनी गेल्या आठवड्यात पाहिली. टीव्ही दर्शकांच्या आकडेवारीचं निरीक्षण करणाऱ्या BARC या संस्थेने दिलेल्या अहवालात Lockdown च्या दुसऱ्या आठवड्यात Network18 ची चॅनेल्स दररोज 19 कोटी लोकांनी पाहिली असल्याचं स्पष्ट झालं आहे. आठवड्यात 42 कोटी दर्शकांनी नेटवर्कची चॅनेल्स पाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 मार्चला देशव्यापी टाळेबंदीची घोषणा केली. त्याला नेटवर्क१८च्या 19.46 कोटी दर्शकांनी पाहिली.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल इंडिया अर्थात BARC ने दिलेल्या आकडेवारीत या आठवड्यात 90 टक्क्यांनी दर्शकसंख्या वाढली आहे. 21 ते 27 मार्च या कालावधीत Network18 च्या चॅनेल्सनी भारतीय टीव्ही क्षेत्रात वर्चस्व गाजवलं. 42 कोटी दर्शक या काळात नेटवर्कची चॅनेल्स पाहात होते. दररोज 19 कोटी जनतेपर्यंत नेटवर्क18 ची चॅनेल्स पोहोचत होती. हा आकडा मागच्या आठवड्यातल्या आकड्याच्या 90 टक्क्यांहून अधिक आहे.

भारतीयांनी मोडलं टीव्ही पाहण्याचं रेकॉर्ड

एकूणच भारतभर या आठवड्यात लोकांची टीव्ही व्ह्युअरशिप वाढली आहे. भारतीय या आठवड्यात 1.2 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी मिनिटं टीव्ही बघत होते. हा आकडा एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. लॉकडाउनच्या दुसऱ्या आठवड्यात लोकांनी घरात बसून अधिकाधिक वेळ टीव्ही पाहण्याला दिला, असं या आकड्यातून दिसतं. टीव्ही पाहण्याची वेळ आणि प्रेक्षकसंख्या यात देशभरात 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Network18 च्या वाहिन्या 22 मार्च रोजी सर्वाधिक पाहिल्या गेल्या. जनता कर्फ्यूच्या दिवशी नेटवर्कला सर्वाधिक दर्शक मिळाले. 22.3 कोटी लोकांनी Network18 ची इंग्रजी, हिंदी, मराठी आणि इतर भाषिक चॅनेल्स पाहिली, अशी नोंद झाली आहे.

न्यूज चॅनेल्सनी सर्वाधिक दर्शक या आठवड्यात मिळवले. वृत्तवाहिन्यांची व्ह्यूअरशिप देशभरात 57 टक्क्यांनी वाढली. ही वाढ सर्व भाषांतल्या न्यूज चॅनेल्समध्ये दिसली.

अन्य बातम्या

लॉकडाउन कधी संपणार? पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत दिले संकेत

या 9 देशात अजून नाही पोहोचला Coronavirus; एक तर आहे चीनचा शेजारी

 

First published: April 2, 2020, 7:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading