Elec-widget

अमेरिकेत नोकरीच्या स्वप्नाचा चक्काचूर; 145 भारतीयांना हातपाय बांधून पाठवलं परत

अमेरिकेत नोकरीच्या स्वप्नाचा चक्काचूर; 145 भारतीयांना हातपाय बांधून पाठवलं परत

काही तरुणांनी एजंट लोकांच्या मार्फत अमेरिकेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण अशा 145 जणांना भारतात परत पाठवण्यात आलं. दिल्लीच्या इंदिरा गांधी एअरपोर्टवर या तरुणांना आणण्यात आलं तेव्हा त्यांचे हातपाय बांधल्यामुळे ते सुजलेले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : अमेरिकेत नोकरी करायला जाणं हे अनेकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही करायची तरुणांची तयारी असते. हे करण्याच्या नादातच काहीजण स्वत:ची फसवणूक करून घेतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे.

काही तरुणांनी एजंट लोकांच्या मार्फत अमेरिकेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण अशा 145 जणांना भारतात परत पाठवण्यात आलं. दिल्लीच्या इंदिरा गांधी एअरपोर्टवर या तरुणांना आणण्यात आलं तेव्हा त्यांचे हातपाय बांधल्यामुळे ते सुजलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि निराशा स्पष्ट दिसत होती.

एजंट्सना दिले 25 लाख रुपये

या तरुणांनी नोकरी मिळवण्यासाठी एजंट्सना 25 - 25 लाख रुपये दिले होते. त्यांना बेकायदेशीररित्या अमेरिकेत आल्याच्या आरोपाखाली इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पकडलं आणि डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवलं. या तरुणांना एअरपोर्टवर आणण्यात आलं तेव्हा ते उभंही राहू शकत नव्हते. त्यांना जेव्हा भारतात परत पाठवण्यात आलं तेव्हा त्यांचे हात-पाय बांधलेले होते. विमानातून उतरण्याआधी त्यांचे बांधलेले हातपाय सोडण्यात आले.

(हेही वाचा : 'आई आजारी आहे, मदत करा',Facebook वर फेक अकाउंट बनवून तरुणाला घातला गंडा)

Loading...

उपासमारीची वेळ

या 145 तरुणांमध्ये 3 महिलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर आणखी 25 बांग्लादेशी नागरिकांनाही अमेरिकेतून परत पाठवण्यात आलं. त्यांच्यामुळे या सगळ्यांना घेऊन येणारं विमान ढाक्याला थांबवण्यात आलं.

अमेरिकेतून परत पाठवलेल्या या तरुणांनी सांगितलं की त्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये नीट खायला प्यायलाही दिलं जात नव्हतं. असह्य वेदनांमुळे ते पू्र्ण मोडून पडले होते.

अमेरिकेत बेकायदेशीररित्या गेलेल्या भारतीयांना परत पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही 23 ऑक्टोबरला अशाच पद्धतीने 117 भारतीयांना परत पाठवण्यात आलं होतं.

======================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...