रतलाम, 18 मे : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू आहे. पण भारतात एक असं गाव आहे ज्या गावातील लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे कोण आहे हेच माहित नाही. या गावामध्ये राजकारण, निवडणुका अशा कोणत्याही चर्चा या गावात नाही. इतकंच काय तर इतर नागरिकांना मिळणाऱ्या कोणत्याही सुविधा या गावातील लोकांना मिळत नाही.
हे गाव मध्य प्रदेशमध्ये आहे. सगळ्यात विशेष म्हणजे मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारसभाही झाल्या. पण तरीदेखील ते या गावापर्यंत पोहचू शकले नाहीत. त्यामुळे या गावातील लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना ओळखतच नाही.
रतलाम लोकसभा मतदार संघात वनक्षेत्रामधील कट्टीवाडा नावाचं हे गाव आहे. या गावाला झबुआ नावानेही ओळखलं जातं. हे गाव दुर्लक्षित आहे. गावात गरिबीचं मोठं संकट आहे. या गावात शिक्षणाचीही बोंब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याविषयी विचारलं असता नाव ऐकल्यासारखं वाटतं असं या गावातील कोल म्हणतात.
सरकार या गावापर्यंत पोहचलंच नाही
जंगल भागामध्ये असलेल्या या गावात अनुसूचित जमातीतील लोक राहतात. या गावात कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे या गावात सोशल मीडियाही नाही. त्यांच्यापर्यंत सरकारच्या कोणत्याही योजना पोहचत नाही.
हेही वाचा : VIDEO : केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना
मोदी आणि गांधी ना ऐकल्यासारखं वाटतं!
या गावामध्ये 80 घरं असल्याची माहिती आहे. या घरांमध्ये किमान 300-400 लोक राहत असतील. एनबीटी या हिंदी वेबसाईटने केलेल्या सर्वेमध्ये या गावाबद्दल माहिती समोर आली आहे. गावामध्ये लोकांना मोदी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल विचारलं असता. त्यांनी त्याची आश्चर्यकारक उत्तरं दिली आहेत.
एका व्यक्तीला विचारलं असता, 'या नावांबद्दल मी ऐकूण आहे. पण मला माहित नाही कोण आहेत हे ?' असं उत्तर त्याने दिलं. दुसऱ्या घरी एक 6 मुलांच्या वडिलांना विचारलं असता त्यानेही अशी प्रतिक्रिया दिली.
सरकारकडून दर्लक्षित झालेल्या या गावाकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि त्यांनाही सर्वसुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा इथल्या गावकऱ्यांनाही आहे. त्यामुळे आता या गावाकडे कोणाचं लक्ष जातं का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.
VIDEO : माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, मग काय पत्नीने शिकवला असा धडा!