मराठी बातम्या /बातम्या /देश /भारतातील 'या' गावात कांदा-लसूण खाण्यास बंदी, वाचा काय आहे त्यामागचं नेमकं कारण

भारतातील 'या' गावात कांदा-लसूण खाण्यास बंदी, वाचा काय आहे त्यामागचं नेमकं कारण

या गावातल्या लोकांचं म्हणणं आहे की, त्यांचे पूर्वजही कांदा-लसूण खात नव्हते. अशा परिस्थितीत आता ते ही परंपरा मोडू शकत नाहीत. इथं हे दोन पदार्थ खाण्यावरच बंधन असल्यानं ते कोणी विकत घेऊन घरी आणत नाही.

नवी दिल्ली, 27 मार्च : कांदा-लसूण (Benefits of onion-garlic) भारतातील बहुतेक घरांमध्ये मोठ्या आवडीने खाल्ले जाते. जेवणाची चव वाढवण्यात या दोन गोष्टी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे पदार्थ आरोग्यासाठीही (health) खूप चांगले मानले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात असं एक गाव आहे, जिथं कांदा आणि लसणावर बंदी आहे. गेल्या अनेक दशकांपासून या गावात लसूण आणि कांद्याला कोणी हात लावलेला नाही.

या गावातल्या लोकांचं म्हणणं आहे की, त्यांचे पूर्वजही कांदा-लसूण खात नव्हते. अशा परिस्थितीत आता ते ही परंपरा मोडू शकत नाहीत. इथं हे दोन पदार्थ खाण्यावरच बंधन असल्यानं ते कोणी विकत घेऊन घरी आणत नाही. त्रिलोकी बिघा असं या गावाचं नाव आहे. हे गाव बिहारमधील जेहानाबाद जिल्ह्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे.

यामागील कथा

हे वाचा - 'मी फोटो काढला आणि credit घेतलं...', Smriti Iraniचं ट्विट व्हायरल

कांदा-लसूण न खाण्यामागे खास कारण असल्याचं या गावातील लोकांनी सांगतात. या गावात एक मंदिर आहे, ज्याला ठाकूरबारी म्हणतात. या मंदिरातील देवतांच्या शापामुळं इथल्या लोकांनी कांदा-लसूण खाणं बंद केलं. गावात राहणाऱ्या एका महिलेच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपूर्वी एका कुटुंबानं ही परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला. परिणामी, त्यांच्या घरात अनेक अनुचित प्रकार घडले. तेव्हापासून इथे अशी चूक कोणी करत नाही.

हे वाचा -मोदी सरकारचा मोठा निर्णय, सप्टेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मिळणार 5 किलो मोफत रेशन

लोक खरेदीही करत नाहीत

गावच्या प्रमुखानं सांगितलं की, त्यांच्या गावात जवळपास तीस ते पस्तीस घरं आहेत. पण घरच्या जेवणात कोणीही लसूण आणि कांदा घालत नाही. ते विकत घेऊन घरी आणलेही जात नाहीत. बरेच लोक याला अंधश्रद्धा मानतात. मात्र, काही लोक विश्वास ठेवतात. या गावात फक्त लसूण आणि कांद्यावरच नाही तर, मांस आणि दारूवरही बंदी आहे. या गावातली ही अनोखी गोष्ट अनेकांना कळली तेव्हा त्यांनी कांद्याच्या वाढत्या भावाचा या गावातल्या लोकांवर काहीही परिणाम होणार नाही, असं गमतीनं म्हटलं.

First published:

Tags: Bihar, Culture and tradition, Onion