मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण सापडताच भारताने घेतला धसका; चीनमधील भारतीयांना उद्याच Airlift करणार

कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण सापडताच भारताने घेतला धसका; चीनमधील भारतीयांना उद्याच Airlift करणार

चीनमधून भारतात परतलेल्या केरळमधील एका व्यक्तीला कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झाली आहे, तर मलेशियात एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर चीनमधील इतर भारतीयांना एअरलिफ्ट (Airlift) करण्यासाठी तातडीने हालचाली सुरू झाल्यात.

  • Published by:  Priya Lad

दिल्ली, 30 जानेवारी : भारतात केरळमध्ये कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) पहिला रुग्ण सापडताच केंद्र सरकारने धसका घेतला आहे. त्यामुळे चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी धडपड सुरू झाली आहे. शुक्रवारी (31 जानेवारी) या भारतीयांना एअरलिफ्ट (Airlift)  केलं जाणार आहे. चीनच्या हुबेई प्रांतात कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे या प्रांतातील वुहान (wuhan) शहरात अडकलेल्या भारतीयांची पहिली बॅच एअरलिफ्ट केली जाणार आहे, अशी माहिती भारतीय दुतावासाने दिली आहे.

दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्यानुसार, कोरोनाव्हारसचा उद्रेक झालेल्या हुबेई प्रांतातील भारतीयांना परतायचं आहे की नाही याबाबत विचारणा करण्यात आली आहे. चीन सरकारलाही भारतीयांची सुटका करण्याची विनंती करण्यात आली आहे. आता चीनकडून फक्त औपचारिक परवानगीची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.

कोरोनाव्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 170 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 7 हजार पेक्षा जास्त जणांचा या आजाराची लागण झाली आहे. सर्वाधिक मृत्यू हुबेई प्रांतात झालेत. वुहानमध्ये डिसेंबर, 2019 मध्ये कोरोनोव्हायरस पसरण्यास सुरुवात झाली. आज जगभरात हा आजार पसरला आहे. त्यामुळे चीनमधील बहुतेक शहरं बंद ठेवण्यात आलीत. ज्यामुळे कुणालाही शहराबाहेर पडणं, शहरात येणं शक्य नाही.

हेदेखील वाचा - भारतात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला; देशावर भीतीचं सावट

कोरोना व्हायरसची लक्षणं

सर्दी

ताप

खोकला

घसा खवखवणे

श्वास घेताना त्रास

डोकेदुखी

कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी काय कराल?

हात स्वच्छ धुवा

शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा

सर्दी-खोकला-तापाची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात राहू नका

प्राण्यांपासून दूर राहा

हेदेखील वाचा - कोरोनाव्हायरसची जगभरात दहशत, व्हायरसला हरवण्यासाठी सरसावले 'हे' श्रीमंत

First published:

Tags: China, Coronavirus, Health