मराठी बातम्या /बातम्या /देश /

हृदयद्रावक! संदीप शिंदे यांची लष्करी कॅम्पमध्ये आत्महत्या; जवानाने स्वत:वर गोळी झाडत संपवलं जीवन

हृदयद्रावक! संदीप शिंदे यांची लष्करी कॅम्पमध्ये आत्महत्या; जवानाने स्वत:वर गोळी झाडत संपवलं जीवन

(File Photo)

(File Photo)

Indian Soldier Suicide: उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील द्रांग्यारी चौकीबाल येथे सेवेवर असणाऱ्या एका भारतीय जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

  • Published by:  News18 Desk

श्रीनगर, 13 डिसेंबर: उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील द्रांग्यारी चौकीबाल येथे सेवेवर असणाऱ्या एका भारतीय जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (indian soldier suicide) केली आहे. संबंधित जवानाने आज पहाटे स्वत:च्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून (indian soldier shot himself by service rifle) आयुष्याचा शेवट केला आहे. भल्या पहाटे गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.

संदीप अर्जुन शिंदे असं आत्महत्या करणाऱ्या भारतीय जवानाचं नाव आहे. तो हवालदार रँकवरील जवान असून त्याची पोस्टींग द्रांग्यारी चौकीबाल येथे करण्यात आली होती. आज पहाटे साडेचारच्या सुमारास शिंदे यांनी स्वत:च्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. गोळी झाडल्यानंतर जखमी अवस्थेतील शिंदे यांना काही जवानांनी तातडीने श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात हलवलं.

हेही वाचा- लेक स्वित्झर्लंडला, घरात एकटीच वृद्ध महिला; लुटारूने हल्ला करून घेतला जीव

पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने जवानाचा वाटेतच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मृत जवान शिंदे यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-भाजपच्या महिला आमदाराचं डेंग्यूमुळे निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील महू बाल याठिकाणी एका मेजरनं देखील आत्महत्या केली होती. संबंधित मेजरने 11 डिसेंबर रोजी रात्री आपल्या निवासस्थानी गोळी झाडून आयुष्याचा शेवट केला होता. ही घटना ताजी असताना, आणखी एका जवानाने गोळी झाडून आपलं जीवन संपवलं आहे.

First published:

Tags: Indian army, Jammu and kashmir, Suicide