कोटा, 07 सप्टेंबर: होणाऱ्या पत्नीनं आत्महत्या (future wife suicide) केल्याची घटना समजल्यानंतर दोन दिवसांनी भारतीय लष्करातील एका जवानानं (Soldiers in the Indian Army commits suicide) टोकाचं पाऊल उचललं आहे. होणाऱ्या पत्नीचा विरह सहन न झाल्यानं 24 वर्षीय जवानानं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. एकमेकांशी लग्न ठरलेल्या या दोघां तरुण तरुणीनं दोन दिवसांच्या आत आत्महत्या केल्यानं गावात खळबळ उडाली आहे. संबंधित जवानानं व्हॉट्सअॅपला भावनिक स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची माहिती मृताच्या भावानं दिली आहे. या दोन्ही घटनांचा तपास पोलीस करत आहेत.
पप्पू लाल यादव असं आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय जवानाचं नाव असून तो राजस्थानातील कोटा येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी त्याचं चित्तौडगड येथील एका तरुणीशी लग्न ठरलं होतं. दोघंही दिवाळीनंतर विवाह बंधनात अडकणार होते. तत्पूर्वी संबंधित तरुणीनं आपल्या राहत्या घरात 4 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली आहे. होणाऱ्या बायकोनं हत्या केल्याची माहिती समजताच पप्पू यादव पार खचून गेले.
हेही वाचा-...म्हणून टोकाचं पाऊल उचललं, मला माफ करा; तलाठ्याकडून डॉक्टर पत्नीचा निर्घृण खून
मागील दोन दिवसांपासून ते तणावात होते. पण विरह सहन न झाल्यानं पप्पू यादव यानं टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी 6 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली आहे. याबाबतची माहिती कोटा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी दिली. पप्पू लाल यादव हे कुमाऊँ रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. सध्या ते देहरादून याठिकाणी तैनात होते. दरम्यान आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अवघ्या दोन दिवसांच्या अंतरानं होणाऱ्या पती पत्नीनं आत्महत्या केल्यानं नातेवाईकांसह गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा-चिमुकल्याला वाचवायला गेले अन् बापलेकासह तिघांनी हरली जिवाची बाजी; बीडमधील घटना
या घटनेची अधिक माहिती देताना मृत जवानाच्या भावानं सांगितलं की, होणाऱ्या पत्नीनं चित्तौडगड जिल्ह्यात आपल्या घरी आत्महत्या केल्यानं पप्पू निराश होता. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून तो खूपच तणावात होता. दरम्यान मृत सैनिकानं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावी पत्नीचे फोटो स्टेटसला अपडेट केले होते. शिवाय या स्टेटस मध्ये 'तुम नही, तो मैं नहीं' असा मजकूर लिहिल्याची माहितीही मृत जवानाच्या भावानं पोलिसांना दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.