नवी दिल्ली 31 ऑक्टोबर: रेल्वे स्टेशनवर मित्राला किंवा पाहुण्यांना भेटायचं असेल तर आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. कारण रेल्वे विभाग (Indian Railways) कोरोना संकटात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशातल्या काही निवडक रेल्वे स्टेशन्सवर प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket) दुप्पट होण्याची शक्यता आहे. सध्या प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत ही 10 रुपये आहे. ती वाढवून 20 रुपये करण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टेशनवर कारण नसताना जाणाऱ्यांनाही अटकाव होणार आहे.
त्याचबरोबर User Development Fee Scheme (UDF Scheme) लागू करण्याचीही सरकारची तयारी आहे. नोव्हेंबर 2020मध्ये देशातल्या 121 स्टेशन्सवर ही योजना लागू करण्याची होण्याची शक्यता आहे. याच स्टेशन्सवर प्लॅटफॉर्म तिकीट वाढवलं जाणार आहे.
देशातल्या विमानतळांवर अशा प्रकारचा चार्ज आकारला जातो. देशातल्या 1050 रेल्वे स्टेशन्सवर अशा प्रकारचा चार्ज लावण्याचे संकेत रेल्वेने दिले आहेत. रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी (Railway Station Redevelopment) यातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग केला जाणार आहे. देशात 7 हजारांच्यापेक्षा जास्त रेल्वे स्टेशन्स आहेत.
भारतीय रेल्वे (Indian Railway) आता रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत आहे. नवीन वेळापत्रकानुसार रेल्वे आता 500 ट्रेन्स बंद तर 10 हजार स्टॉप रद्द करणार आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) चे संकट दूर झाल्यानंतर हे नवे वेळापत्रक लागू केले जाईल, जेव्हा पूर्वीसारखे रेल्वेचे संचालन सुरू होईल.
भयंकर! ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच दुकानदाराची गोळी झाडून हत्या
एका मीडिया अहवालानुसार वेळापत्रकातील या बदलावानंतर भारतीय रेल्वेची कमाई वार्षिक 1500 कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाईल. रेल्वे मंत्रालयाच्या (Ministry of Railway)अंदाजानुसार 1500 कोटी रुपयांची ही अनुमानित कमाई कोणतेही रेल्वेभाडे किंवा अन्य चार्ज वाढवल्याशिवाय होईल. वेळापत्रकात केलेले बदल आणि अन्य ऑपरेशन पॉलिसीमध्ये केलेल्या बदलानंतर हे उत्पन्न मिळेल. अद्याप कोणत्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहेत, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway