SheshNaag ने मोडला Super Anaconda चा रेकॉर्ड! एका दिवसात भारतीय रेल्वेनं रचला नवा इतिहास, पाहा VIDEO

SheshNaag ने मोडला Super Anaconda चा रेकॉर्ड! एका दिवसात भारतीय रेल्वेनं रचला नवा इतिहास, पाहा VIDEO

भारतीय रेल्वेनं आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. आज 2.8 किमी लांब शेषनाग (SheshNaag) ही ट्रेन रुळावर उतरली.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 जून : भारतील रेल्वे जगातील सर्वोत्तम आणि प्रसिद्ध रेल्वेसेवा आहे. आता याच भारतीय रेल्वेनं आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. आज 2.8 किमी लांब शेषनाग (SheshNaag) ही ट्रेन रुळावर उतरली. यासह भारतीय रेल्वेनं एक इतिहास आपल्या नावावर केला. शेषनाग रुळावर धावण्यासाठी रेल्वेनं चार इंजिनचा वापर केला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नागपूर विभाग ते कोरबा दरम्यान 2.8 किमी लांबीची शेषनाग 251 वॅगनसह चालवण्यात आली.

शेषनागनं 6 तासात 260 किमी अंतराचा प्रवास पूर्ण केला. हा अनोखा प्रयोग माल वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी करण्यात आला. शेषनाग ट्रेनला रुळावर चालविण्यासाठी त्यामध्ये 6000 हॉर्स पॉवर क्षमता असणारे 4 इलेक्ट्रिक इंजिन बसविण्यात आले होते. याआधी भारतीय रेल्वेचीच सुपर अ‍ॅनाकोंडा (Super Anaconda ) ही ट्रेन 2 किमी लांबीची असून यात 6000 हॉर्स पॉवर क्षमता असणारे तीन इलेक्ट्रिक इंजिन बसविण्यात आले होते.

वाचा-भारतीयांनी करून दाखवलं! वाचा कशी तयार झाली Made in India कोरोना वॅक्सीन

यासह, रेल्वेने एका दिवसात सुपर अ‍ॅनाकोंडाचा रेकॉर्ड मोडला. याआधी बुधवारी रेल्वेने तीन इंजिन आणि फ्रेट गाड्या जोडून 2 किमी लांबीची सुपर अ‍ॅनाकोंडा ट्रेन तयार केली. ही सुपर ट्रेन ओडिशातील लाजकुरा ते राउरकेला दरम्यान धावली. तर आज 2.8 लांबीची शेषनाग ट्रेन धावली.

वाचा-VIDEO : 'हाय गरमी...' नोरा फतेहीच्या गाण्यावर PPE सूटमधील डॉक्टरचा भन्नाट डान्स

167 वर्षांनंतर पहिल्यांदाच वेळेवर पोहचली ट्रेन

बुधवारी रेल्वेने आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला. 1 जुलै, 2020 रोजी 24 तासांदरम्यान एकूण 201 प्रवासी गाड्या धावल्या आणि सर्व ट्रेन वेळेत पोहचल्या. म्हणजेच तब्बल 201 गाड्या वेळापत्रकानुसारच निश्चित स्थानकावर पोहोचल्या. 167 वर्षांनंतर पहिल्यांदाच असा प्रकार घडला.

वाचा-जगाला शॉक देत 11 हजार फूटांवर पोहचले मोदी, पाहा सीमेवरचे PHOTOS

संपादन-प्रियांका गावडे.

First published: July 3, 2020, 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading