Home /News /national /

रेल्वेमध्ये साहित्य विसरलंय का? इकडे-तिकडे फिरू नका; रेल्वेच्या साईट Mission Amanat वर शोधा

रेल्वेमध्ये साहित्य विसरलंय का? इकडे-तिकडे फिरू नका; रेल्वेच्या साईट Mission Amanat वर शोधा

मिशन अमानत अंतर्गत, रेल्वे सुरक्षा दल (RPF) रेल्वे प्रवाशांचे हरवलेले सामान शोधून काढेल आणि या सामानाचा फोटो आणि वर्णन पश्चिम रेल्वेच्या वेबसाइटवर टाकेल. यामुळे प्रवाशांना त्यांचे सामान ओळखणे आणि परत घेणे सोपे होईल.

    नवी दिल्ली, 11 जानेवारी : दरवर्षी हजारो रेल्वे प्रवाशांचे कोट्यवधी रुपयांचे सामान ट्रेनमध्ये विसरले जाते, हरवले जाते. या वस्तू परत मिळणे हे सर्वसामान्यांसाठी कठीण काम होते. प्रवाशांचा हा त्रास कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने नवी सेवा सुरू केली आहे. त्याला 'मिशन अमानत' (Mission Amanat) असे नाव देण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने (Western Railways) ट्विट करून ही माहिती दिली आहे. मिशन अमानत अंतर्गत, रेल्वे सुरक्षा दल (RPF) रेल्वे प्रवाशांचे हरवलेले सामान शोधून काढेल आणि या सामानाचा फोटो आणि वर्णन पश्चिम रेल्वेच्या वेबसाइटवर टाकेल. यामुळे प्रवाशांना त्यांचे सामान ओळखणे आणि परत घेणे सोपे होईल. तुमचे हरवलेले सामान कसे शोधायचे प्रवाशांना त्यांचे हरवलेले सामान शोधण्यासाठी आणि ओळखण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या http://wr.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या वेबसाइटवर, तुम्हाला “Mission Amanat – RPF” या टॅबवर क्लिक करावे लागेल. येथे, आरपीएफ हरवलेल्या वस्तूंचे तपशील मिशन अमानत अंतर्गत फोटोंसह शेअर करते. जर तुम्हाला तुमचे साहित्य वेबसाइटवर दिसले, तर तुम्ही ते तुमचे असल्याचा पुरावा देऊन मिळवू शकता. हे वाचा - ‘एक वर्षाचे निलंबन म्हणजे आमदारकी रद्द होण्यापेक्षाही वाईट’, भाजपच्या 12 आमदार निलंबनावर सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण 2.58 कोटी रुपयांचे साहित्य केले परत पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 2021 या वर्षात जानेवारी ते डिसेंबर दरम्यान, पश्चिम रेल्वे झोनच्या रेल्वे संरक्षण दलाने एकूण 1,317 रेल्वे प्रवाशांचा 2.58 कोटी रुपयांचा माल ताब्यात घेतला आणि योग्य पडताळणीनंतर त्याच्या हक्काच्या मालकांना परत केला. पश्चिम रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दल ऑपरेशन 'मिशन अमानत' अंतर्गत रेल्वे प्रवाशांना ही सेवा देत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Indian railway, Railway

    पुढील बातम्या