Home /News /national /

नव्या वर्षात रेल्वेने प्रवास करणार असाल तर टेंन्शन नाही, नव्या Helpline वर मिळणार या 8 सुविधा

नव्या वर्षात रेल्वेने प्रवास करणार असाल तर टेंन्शन नाही, नव्या Helpline वर मिळणार या 8 सुविधा

New Delhi: Vande Bharat Express, India's first semi-high speed train, leaves from New Delhi Railway Station after its flag off by Prime Minister Narendra Modi (unseen), Friday, Feb.15, 2019. The train will run between Delhi-Varanasi. (PTI Photo/Kamal Singh) (PTI2_15_2019_000016B)

New Delhi: Vande Bharat Express, India's first semi-high speed train, leaves from New Delhi Railway Station after its flag off by Prime Minister Narendra Modi (unseen), Friday, Feb.15, 2019. The train will run between Delhi-Varanasi. (PTI Photo/Kamal Singh) (PTI2_15_2019_000016B)

रेल्वेचा आता एकच Helpline नंबर असणार आहे. इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पाँस सिस्टिम IVRS अशी ही सुविधा आहे.

    नवी दिल्ली 01 जानेवारी : प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेने (Indian Railway) नवी सुविधा दिली आहे. प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा विविध गोष्टींची माहिती हवी असते. प्रवासात अनेकदा अडचणी येत असतात. त्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी किंवा त्या सोडविण्यासाठी प्रवाशांना कुठे संपर्क साधावं याची बऱ्याचदा माहिती नसते. किंवा मदत मागायची असेल तर एकाच विभागाचे विविध नंबर्स असतात त्यामुळे प्रवासी कंटाळून जातात किंवा ते या हेल्पलाईनवर(Helpline) मदत मागणेही टाळतात. या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन रेल्वेने सर्व तक्रारींसाठी एकाच नंबरवर मदत मिळावी अशी खास सोय केलीय. रेल्वे गाड्यांबाबत किंवा आरक्षणाबाबात काही माहिती हवी असेल प्रवाशांना रेल्वेचा 139 हा Helpline नंबर माहित आहे. त्यामुळे तोच नंबर आता सगळ्याच तक्रारीसाठी असणार असून 139 वर त्याची सोय करण्यात आलीय. रेल्वेचा आता हाच एक Helpline नंबर असणार आहे. इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पाँस सिस्टिम IVRS अशी ही सुविधा राहणार आहे. 139वर या सुविधा मिळणार सुरक्षा आणि मेडिकल इमरजन्सी, स्वच्छता आणि कॅटरिंग बाबतच्या तक्रारी. कोच संदर्भातल्या तक्रारीसांठीही आता 139 हाच नंबर असेल. रेल्वे अपघात, भरपाई आणि भ्रष्टाचारा संदर्भातही 139वर मदत मिळणार आहे. ही सेवा 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. सुरक्षा आणि मेडिकल इमरजन्सीच्या मदतीसाठी 1 नंबर, PNR, भाडं आणि तिकीट बुकिंगसाठी 2 हा क्रमांक. कॅटरिंग बाबतच्या तक्रारी 3 नंबर. नव्या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तो महागात पडणार आहे. रेल्वेच्या भाड्यात 1 पैसे ते 4 पैसे प्रतिकिलोमीटरची वाढ झालीय. पॅसेंजर आणि फ्रेट अशा दोन्ही भाड्यांमध्ये बदल करण्याची ही योजना आहे पण आता फ्रेटसाठीचं भाडं आधीच जास्त असल्याने यामध्ये वाढ होणार नाही. पण पॅसेंजर ट्रेनच्या भाड्यात वाढ होईल. एसी, स्लीपर, जनरल आणि कमी अंतराच्या गाड्यांचं भाडंही वाढवलं जाणार आहे. रेल्वेभाड्यात वाढ करण्याच्या या निर्णयाला नोव्हेंबरमध्येच मंजुरी मिळाली आहे. पण झारखंडच्या निवडणुकांमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता, अशी माहिती आहे. रेल्वेने गेली काही वर्षं भाडं वाढवलेलं नव्हतं. पण आता मात्र व्यावहारिक कारणांमुळे हा निर्णय घ्यावा लागला, असं रेल्वेचं म्हणणं आहे. असं असलं तरी लोकलचं भाडं मात्र वाढणार नाही. त्यामुळे मुंबईकरांना काळजी करण्याचं कारण नाही. इंडियन रेल्वे कॉ़न्फरम्स असोसिएशनने एक पत्रक जारी केलं आहे. यामध्ये 1 जानेवारी 2020 पासून रेल्वेचं बेसिक भाडं वाढवण्यात आलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या