मराठी बातम्या /बातम्या /देश /

Indian Railway Fact : रेल्वे तिकीटासोबत 'या' सुविधा ही मिळतात, तुम्हाला त्या माहितीयत का?

Indian Railway Fact : रेल्वे तिकीटासोबत 'या' सुविधा ही मिळतात, तुम्हाला त्या माहितीयत का?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई १५ नोव्हेंबर : आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी ट्रेनने प्रवास केला आहे. छोट्या काही तासांच्या प्रवासापासून ते एक ते दोन दिवसांचा प्रवास तुम्ही ट्रेनने करु शकता. ट्रेन ही कमी खर्चीक आहे आणि ती आपल्याला वेळेत पोहोचवते. त्यानमुळे बरेचसे असे लोक आहेत, जे लांबच्या प्रवासासाठी ट्रेनने प्रवास करणं पसंत करतात.

आता हे तर तुम्हाला माहित आहे की, ट्रेनने प्रवास करण्यासाठी त्याचे तिकीट काढणे गरजे असते आणि लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचं रिजर्वेशन तिकीट घ्यावं लागतं ज्यामुळे लोकांना आरामदायी प्रवास करता येतो.

पण याच तिकीटाबद्दल आज आम्ही अशी गोष्ट सांगणार आहे, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल, चला याबद्दल जाणून घेऊ

हे तिकीट तुम्हाला फक्त ट्रेनमध्ये बसण्याचा अधिकार देत नाही, तर या तिकीटामुळे तुम्ही आणखी काही गोष्टींचा आणि सेवांचा देखील लाभ देखील घेऊ शकता.

विमा

सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे विमा, हा ट्रॅवर विमा आहे. जर तुम्ही तिकीट बुक करताना विमा घेतला तर तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. रेल्वे प्रवास विमा अंतर्गत, ट्रेनने प्रवास करताना तुमचा मृत्यू किंवा तात्पुरते अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात.

हा विमा अपघात रेल्वे अपघात किंवा प्रवासादरम्यान तत्सम परिस्थितीच्या बाबतीत खूप उपयुक्त आहे. कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व असल्यास, विम्याचे संरक्षण 7.5 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच या काळात रुग्णालयात दाखल आणि उपचारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत विमा उपलब्ध आहे.

ही रक्कम मृत्यू आणि अपंगत्व कव्हरेजपेक्षा जास्त आहे. या विमा अंतर्गत रेल्वे अपघात, चोरी, डकैती किंवा अशा कोणत्याही परिस्थितीसाठी कव्हरेज उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला फक्त 49 पैसे खर्च करावे लागतील.

वायफाय

जर तुम्ही ट्रेनची वाट पाहत असाल आणि तुम्ही स्टेशनवर असाल तर तुम्ही मोफत वायफायचा आनंद घेऊ शकता. आता ही सुविधा बहुतेक रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे.

प्रथमोपचार पेटी

जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये जाता आणि तुम्हाला प्रवासादरम्यान औषध इत्यादींची आवश्यकता असते, तेव्हा तुम्ही TTE कडून त्याची मागणी करू शकता. प्रत्येक प्रवाशाला रेल्वेने ही सुविधा दिली आहे.

वेटिंग रूम

जर तुमच्याकडे तिकीट असेल तर तुम्ही तुमच्या तिकिटाच्या वर्गानुसार वेटिंग रूममध्ये सहज आराम करू शकता. यासाठी तुम्हाला रेल्वेने सुविधा दिली आहे आणि ट्रेन येईपर्यंत तुम्ही इथे बसू शकता.

क्लोक रूमची सुविधा

ज्या लोकांकडे ट्रेनची तिकिटे आहेत ते स्टेशनवरील क्लोक रूम वापरू शकतात आणि त्यांचे सामान जमा करू शकतात.

First published:

Tags: Indian railway, Train, Viral news