Home /News /national /

'...अन्यथा संपूर्ण भारतातील रेल्वे सेवा 2 तासांसाठी थांबवणार', प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

'...अन्यथा संपूर्ण भारतातील रेल्वे सेवा 2 तासांसाठी थांबवणार', प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

21 ऑक्टोबरपर्यंत रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकारनं निर्णय घेतला नाही तर संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : अनलॉक हळूहळू होत असताना आता रेल्वे युनियन आणि रेल्वेसाठी काम करणारे मजुर आणि कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारण्याचा इशारा दिला आहे. गेल्या 46 वर्षातला हा सर्वात मोठा संप असणार आहे. 1974 च्या संपाची पुनरावृत्ती होणार का? हे येत्या 21 ऑक्टोबरला समजणार आहे. रेल्वे कर्माचारी आणि मजुरांना बोनस देण्याबाबत वारंवार मागणी होत आहे मात्र अद्यापही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. दिवाळीआधी हा निर्णय मार्गी लावण्याबाबत संघटना ठाम आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकारनं निर्णय घेतला नाही तर संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी हा संप करण्यात येणार असून दोन तास संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प करण्यात येईल असा इशारा रेल्वे युनियनकडून देण्यात आला आहे. सरकारने 21 ऑक्टोबरपर्यंत बोनस जाहीर केला नाही तर 22 ऑक्टोबरपासून रेल्वे कर्मचारी संपावर जात असल्याचे ऑल इंडिया रेलवे मेन्स फेडरेशन मंत्री शिवगोपाल मिश्रा यांनी स्पष्ट केलं. हे वाचा-राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये केले दाखल या संदर्भात पूर्व मध्य रेल्वे कर्मचारी संघ धनबाद विभागाचे विभागीय मंत्री पीके पांडे यांनीही सर्व प्रांतांना अखिल भारतीय रेल्वे मेन्स फेडरेशनच्या आवाहनाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. जर बोनस नसेल तर कोणतेही काम नाही तसेच नाईट आलाउन्समध्येही कपात होत असल्यानं कर्मचारी रात्रीच्या कामावर जाणार नाहीत असंही सांगण्यात आलं आहे. बोनस मिळाला नाही तर कर्मचारी कामावर जाणार नाहीत त्यामुळे दिवाळी आधी रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी जोर धरत आहे. तसंच खरंच जर रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप केला तर प्रवाशांचा मोठा खोळंबा होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाकडून या संदर्भात काय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
    First published:

    Tags: Indian railway

    पुढील बातम्या