आता रेल्वेच्या या मार्गांवर मिळणार ‘मसाज’ सर्विस

भारतीय रेल्वेनं ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता धावत्या रेल्वेमध्ये देखील मसाज सेवा मिळणार आहे. त्यासाठी शुल्क मोजावे लागणार आहेत. आरामदायी प्रवासासाठी ही सेवा सुरू केली जाणार आहे.

  • Share this:

आता धावत्या ट्रेनमध्ये देखील तुम्हाला मसाज मिळणार आहे. भारतीय रेल्वे त्याबाबत आता विचार करत आहे. रतलाम मंडळनं हा प्रस्ताव तयार केला आहे.

इंदूरवरून धावणाऱ्या रेल्वेमध्ये ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. यामध्ये देहरादून – इंदूर एक्सप्रेस ( 14371 ), नवी दिल्ली – इंदूर इंटरसिटी एक्सप्रेस ( 12416 ) आणि इंदूर – अमृतसर एक्सप्रेस ( 19325 ) या गाड्यांचा समावेश आहे.

हा निर्णय ऐतिहासिक आणि पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. रेल्वे प्रवास आरामदायी व्हावा यासाठी ही सेवा देण्यात येत आहे. यासाठी अधिक शुल्क आकारले जातील अशी माहिती रेल्वेचे संपर्क अधिकारी राजेश वाजपेयी यांनी दिली.

या निर्णयामुळे रेल्वेच्या नफ्यात वाढ होईल. वर्षाला 20 लाख रूपये रेल्वेला मिळतील. 20,000 प्रवासी वाढल्यामुळे तिकीट विक्री वाढून रेल्वेला 90 लाखांचा फायदा होणार असल्याची माहिती देखील यावेळी राजेश वाजपेयी यांनी दिली.

पुढील 10 ते 15 दिवसामध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही सेवा पुरवली जाईल. रेल्वेतून 3 ते 5 मालिशवाले प्रवास करतील. त्यांना ओळखपत्र दिलं जाईल. मालिशसाठी 100 रूपये मोजावे लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 10:46 AM IST

ताज्या बातम्या