Home /News /national /

40 सेकंदात बुक करायचे देशभरातली निम्मी रेल्वे तिकिटं; कॉर्पोरेट कंपनीला लाजवेल असं रॅकेट

40 सेकंदात बुक करायचे देशभरातली निम्मी रेल्वे तिकिटं; कॉर्पोरेट कंपनीला लाजवेल असं रॅकेट

रेल्वेची तिकिट बुकिंग करणारं मोठं रॅकेट पकडण्यात आलं असून या प्रकरणात आतापर्यंत 26 जणांना अटक करण्यात आली आहे.

    मुंबई, 29 जानेवारी : रेल्वेचं तात्काळ बुकींग करताना अनेकदा तुम्हाला ते मिळालं नसल्याने अडचण झाली असेल. ते न मिळण्यामागे एक मोठं रॅकेट कार्यरत होतं ही बाब नुकतीच उघडकीस आली होती. आता या प्रकरणात तब्बल 26 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. तिकीट बुकिंग करणारी टोळी एखाद्या कार्पोरेट कंपनीप्रमाणेच काम करत होती. यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची एक टीम दुबईतून काम बङायची. भारतात एक प्रमुख, व्यवस्थापक, मुख्य विक्रेते आणि एजंट असे मिळून जवळपास 20 हजार जण यात कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आणि याची पाळमुळं खणून काढण्यासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागला. आरपीएफच्या माहितीनुसार या रॅकेटचा सूत्रधार हामिद अशरफ असून तो दुबईत वास्तव्याला असल्याची माहिती मिळते. अशरफला 2016 मध्ये उत्तर प्रदेशातील गोंडा इथून तिकिटात फेरफार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याचा 2019 ला झालेल्या उत्तर प्रदेशातील बॉम्बस्फोट प्रकरणातही हात असल्याचं तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये रेल्वेच्या तिकिटांवर डल्ला मारणाऱ्या रॅकेटमधील 26 लोकांना अटक करण्यात आलं आहे. यामध्ये भारतातील या रॅकेटचा सूत्रधार गुलाम मुस्तफाचा समावेश आहे. त्याला बेंगळुरूत अटक करण्यात आली. तसेच विभागवार या रॅकेटची सुत्रे सांभाळणाऱ्यांनाही पकडण्यात आलं आहे. वाचा : डिजिटल ट्रान्झेक्शन्सवर एक्स्ट्रा चार्जेस, पेटीएम म्हणते... ऑनलाइन बुकिंग सुरु झाल्यानंतर 40 सेकंदातच रेल्वेची अर्धी तिकिटे खरेदी करत असत. यासाठी देशातील 20 हजार एजंटनी असे सॉफ्टवेअर वापरलं होतं की त्यामुळे सिक्युरिटी क्लिअरन्स करण्याची आवश्यकता पडत नव्हती. एवढंच काय तर ओटीपीही द्यावा लागत नव्हता. या रॅकेटमधील 'गुरुजी' नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. रॅकेटमधील पैशांची व्यवस्था तो सांभाळत असे. हे पेमेंट वॉलेट होणार बंद, लवकरच काढून घ्या पैसे, नाहीतर बसेल गंडा
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Indian railway

    पुढील बातम्या