आजपासूनच सुरू होणार रेल्वेचं बुकिंग काउंटर; पण ही असेल अट

आजपासूनच सुरू होणार रेल्वेचं बुकिंग काउंटर; पण ही असेल अट

शुक्रवारपासून ऑनलाइनच नाही, तर काही ठराविक काउंटरवरही रेल्वेची तिकीट विक्री सुरू होणार आहे. श्रमिक स्पेशल ट्रेनचं आरक्षण तिथून करता येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मे : कोरोना व्हायरस (Coronavirus)चा फैलाव रोखण्यासाठी देशामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा (Lockdown 4.0) आज 58 वा दिवस आहे. आता श्रमिक स्पेशल गाड्या सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच या गाड्यांचं तिकीट काउंटरवर मिळणार आहे. काही ठराविक बुकिंग काउंटर उद्यापासूनच सुरू करण्यात येणार आहेत. सुरुवातीला एक तृतीयांश तिकीट काउंटर्स उघडण्यात येतील. पण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करूनच रांगेत तिकीट विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ट्रेनच्या तिकिटांचे बुकिंग देशभरातील जवळपास 1.7 लाख कॉमन सर्व्हिस सेंटरवर सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या 2-3 दिवसात काही देशभरातील काही निवडक रेल्वे स्टेशनवर काऊंटर रिझर्व्हेशन देखील करता येणं शक्य होणार आहे. याकरता सध्या प्रोटोकॉल तयार केले जात आहेत. म्हणजेच रेल्वे काऊंटवर जाऊन देखील तिकिट आरक्षण करता येणं शक्य होणार आहे. ऑनलाइन तिकिटांबरोबर हाही पर्याय खुला करून देण्यात येणार आहे.

(हे वाचा-विमान प्रवासासाठी या नियमांचे पालन केल्यास मिळणार परवानगी, सरकारकडून SOP जारी)

रेल्वे मंंत्र्यांनी अशी माहिती दिली की दुपारी 12 वाजेपर्यंत 73 ट्रेन बुकिंगसाठी उपलब्ध होती. आतापर्यंत 149025 तिकीट बुक करण्यात आले आहेत. श्रमिक स्पेशल ट्रेन्सबाबत बोलताना रेल्वे मंत्री म्हणाले की, हे मिशन आमच्यासाठी आव्हानात्मक होते, मात्र यामध्ये सरकार यशस्वी झाले आहे.

मध्य रेल्वेची  किती काउंटर?

सीएसएमटी--  4

दादर--2

ठाणे--2

एलटीटी-- 3

कल्याण-2

पनवेल--2

बदलापूर--1

इतर कुठे असतील तिकीट काउंटर्स?

पीयूष गोयल पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन या मिशनचे मॉनिटरिंग करत आहेत. यासंदर्भात गोयल यांनी ट्विट देखील केले आहे, भारतीय रेल्वेने संचालित केलेल्या 2,050 ट्रेन्समधून आतापर्यंत 30 लाख कामगार त्यांच्या घरी पोहोचले आहेत, असं गोयल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये छोट्या व्यवसायिकांसाठी खूशखबर! फेसबुक सुरू करणार 'ऑनलाइन दुकान')

पीयूष गोयल पुढे म्हणाले की, श्रमिक ट्रेन चालवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार विशेष सक्रिय होते. मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये देखील चांगले काम झाले. ओडिसा आणि बंगालमधूल श्रमिक स्पेशल ट्रेन्सची मागणी होती मात्र अम्फानमुळे ही सेवा या राज्यांसाठी थांबण्यात आली आहे. 23 मे नंतर पुन्हा या राज्यांसाठी श्रमिक ट्रेन्स चालवण्यात येतील असंही गोयल म्हणाले.

First published: May 21, 2020, 10:48 PM IST

ताज्या बातम्या