मराठी बातम्या /बातम्या /देश /

होळीच्या दिवशी सासरी जाणं नववधूला पडलं महागात; स्टेशनवर पोहोचली पण...

होळीच्या दिवशी सासरी जाणं नववधूला पडलं महागात; स्टेशनवर पोहोचली पण...

लग्न झाल्यानंतर सासरी जाताना नववधू जेव्हा ट्रेन पकडण्यासाठी निघाली तेव्हा... होळीच्या सुट्टीमुळे काय झालं वाचा...

लग्न झाल्यानंतर सासरी जाताना नववधू जेव्हा ट्रेन पकडण्यासाठी निघाली तेव्हा... होळीच्या सुट्टीमुळे काय झालं वाचा...

लग्न झाल्यानंतर सासरी जाताना नववधू जेव्हा ट्रेन पकडण्यासाठी निघाली तेव्हा... होळीच्या सुट्टीमुळे काय झालं वाचा...

  • Published by:  Manoj Khandekar
मिर्झापूर (उत्तर प्रदेश), 10 मार्च - राज्यासह देशभरात आज सगळीकडे होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. महाराष्ट्र, कोलकाता, बंगाल, नवी दिल्ली याठिकाणी मोठा रंगोत्सव साजरा केला जातो आहे. पण होळी या सणाच्या काळात जर नववधू माहेर घरी निघाली आणि त्यात काही गोंधळ झाला तर...? असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये घडला आहे. होळीच्या उत्सवासाठी देशभरातून लोक आपल्या गावी हा रंगोस्तव साजरा करण्यासाठी जात असतात. त्यामुळे रेल्वेमध्ये मोठी गर्दी होत असते. अशीच गर्दी एका नववधूला चांगलीच महागात पडली आहे. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. लग्न झाल्यानंतर सासरी जाताना नववधू जेव्हा ट्रेन पकडण्यासाठी निघाली तेव्हा रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. कारण वधू सासरी जाण्याऐवजी रेल्वे स्थानकावरच अडकून  राहिली. जेव्हा वधूपक्षातील तिचे नातेवाईक मदतीसाठी धावत होते तोपर्यंत ट्रेन सुटली होती. यानंतर नववधूला चक्क अश्रू अनावर झाले होते. आणि ती रेल्वे स्थानकावरच रडू लागली. वाचा - रंगोलीने चव्हाट्यावर आणली प्रायव्हेट गोष्ट, बहिणीच्या त्या ट्वीटमुळे कंगना भडकली दरम्यान, जौनपूर जिल्ह्यातील मिर्झापूरच्या वधूच्या भावाने ही सविस्तर घटना नेमकी काय झाली याबाबत सांगितलं आहे. त्याने सांगितल्यानुसार, त्याच्या बहिणीचं लग्न पश्चिम बंगालमधील खडकपूर गावात राहात असणाऱ्या नवीन सोनकर सोबत झालं होतं. लग्नानंतर सासरी जाण्यासाठीची त्यांची ट्रेन मिर्झापूर स्थानकावरून निघणार होती. त्यासाठी पुरुषोत्तम एक्सप्रेसमध्ये त्यांचं रिजर्वेशन सुद्धा केले गेले होते. दुर्दैवाने सासरी जाणारी ही ट्रेन चक्क चार तास उशिरा धावत होती. होळीच्या सणामुळे ट्रेनला मोठी गर्दी सुद्धा होती. पण चार तासानंतर जेव्हा ट्रेन मिर्झापूर रेल्वे स्थानकावर आली तेव्हा प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी केली. गर्दीमुळे स्थानकावर मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी पती नवीन सोनकर एसी कोचमध्ये चढला. त्याच्यासोबत त्याचे नातेवाईकसुद्धा ट्रेनमध्ये चढले. मात्र त्याची पत्नी मात्र या सर्व गर्दीत स्थानकावरच राहिली आणि मोठा गोंधळ उडाला. यावेळी वधू पक्षाकडून स्थानकावर ट्रेन थांबवण्यासाठी मोठा आरडाओरडा सुद्धा केला गेला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान यानंतर पती आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ट्रेनमधून निघाला पण पत्नी मात्र रेल्वे स्थानकावरच अडकून पडली. त्यामुळे नाईलाजाने या पत्नीला दुखी होऊन तिच्या माहेरी परतावं लागलं आहे. अन्य बातम्या ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा, मात्र सचिन पायलट ट्रेंडिंगमध्ये! 16 महिन्यांची चिमुकली झोपेत रडायची, CCTV तून समोर आली धक्कादायक गोष्ट
First published:

Tags: Holi, Indian railway, Uttar pradesh

पुढील बातम्या