VIDEO : चालत्या ट्रेनमधून पडणाऱ्या त्याला RPF जवानांनी असं वाचवलं!

VIDEO : चालत्या ट्रेनमधून पडणाऱ्या त्याला RPF जवानांनी असं वाचवलं!

अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर एक मोठी दुर्घटना टळली. एक तरुण चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये फसला...

  • Share this:

अहमदाबाद, 25 सप्टेंबर : अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर एक मोठी दुर्घटना टळली. एक तरुण चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये फसला. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या RPF जवानाने मात्र त्याचा जीव वाचवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडिओ ट्वीट केला. आश्रम एक्सप्रेस रेल्वे स्टेशनहून निघाली होती. त्याचवेळी एक जण जिन्यावरून धावतधावत आला आणि चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याचवेळी त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. RPF च्या जवानांनी त्याला पकडलं आणि धक्का देऊन ट्रेनच्या आत ढकललं.

साताऱ्यातून उदयनराजेंना शह देण्यासाठी शरद पवार स्वतः उतरणार रिंगणात?

या जवानांना हे लक्षात यायला थोडा जरी वेळ लागला असता तरी त्या तरुणाचा जीव गेला असता. रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे, तुम्ही फिट आणि स्मार्ट असलात तरी कृपया चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका.

==================================================================================

5 वर्ष कुठे होता? प्रचारासाठी आलेल्या काँग्रेस आमदाराला आजीबाई सुनावले खडेबोल, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 06:59 PM IST

ताज्या बातम्या