कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी भारतीय रेल्वे बोर्डाचा असा आहे नवीन प्लॅन

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी भारतीय रेल्वे बोर्डाचा असा आहे नवीन प्लॅन

151 एक्स्प्रेस सुरुवातीच्या टप्प्यात नव्या वेळापत्रकानुसार चालवण्यात येतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 जुलै: देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. संक्रमण रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. देशभरात श्रमिक आणि परवानगी घेऊन जाणाऱ्या नागरिकांसाठी ट्रेननं सेवा सुरू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सेवा 15 ऑगस्टनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान रेल्वेकडून एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांमध्ये काही बदल करण्याबाबत विचार सुरू आहे.

एक्स्प्रेसच्या वेळा आणि नव्या वेळापत्रकात ठरावीक स्थानकांवर गाड्यांना थांबा देण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एक्स्प्रेसचे हॉल्ट कमी केल्यामुळे कोरोनाचं संक्रमण आणि फैलाव कमी होईल असा कयास आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूच्या साथीमुळे निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब झाला, पण त्याची अंमलबजावणी लवकरच होईल असं सांगण्यात आलं.

हे वाचा-कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राचा 'हा' जिल्हा भूकंपाने हादरला

एक्स्प्रेसच्या वेळा आणि कोणत्या स्थानकांवर थांबवण्यात येणार, कोणती स्थानकं वगळणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. सध्या याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे स्टॉप कमी करण्याबाबत नवीन नियमावली लवकरच जाहीर होऊ शकते. 151 एक्स्प्रेस सुरुवातीच्या टप्प्यात अशा पद्धतीनं चालवण्यात येतील. यामुळे प्रवासाचा वेळही कमी होईल अशी माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 5, 2020, 11:17 AM IST

ताज्या बातम्या