मराठी बातम्या /बातम्या /देश /मोठा दिलासा; रेल्वे चालवणार ऑक्सिजन एक्सप्रेस, Green Coridorच्या माध्यमातून होणार वाहतूक

मोठा दिलासा; रेल्वे चालवणार ऑक्सिजन एक्सप्रेस, Green Coridorच्या माध्यमातून होणार वाहतूक

Medical Oxygen supply via Railway: रेल्वेच्या माध्यमातून मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज झाली आहे.

Medical Oxygen supply via Railway: रेल्वेच्या माध्यमातून मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज झाली आहे.

Medical Oxygen supply via Railway: रेल्वेच्या माध्यमातून मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज झाली आहे.

नवी दिल्ली, 18 एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात हाहाकार उडाला आहे. दररोज कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत वैद्यकीय ऑक्सिजन (Medical Oxygen), रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा (Oxygen supply via railway) करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर रेल्वेने याला मान्यता दिली आहे. भारतीय रेल्वेकडून आता खास ऑक्सिजन एक्सप्रेस (Oxygen Express) चालवण्यात येणार आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संकटात गंभीर वैद्यकीय परिस्थितीत उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. यासाठी रेल्वेमार्फत महत्वाच्या मार्गांवर द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू अर्थात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकर्स रेल्वेने नेता येऊ शकतील का याची चाचणी करण्यासाठी भारतीय रेल्वेसोबत संपर्क साधला होता. वाहतुकीच्या संदर्भातील चाचणी सुनिश्चित करण्यासाठी विविध चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राकडून टँकर्सचा पुरवठा केला जाणार आहे. हे रिकामे टँकर मुंबई आणि आसपास असलेल्या कळंबोली / बोईसर रेल्वे स्थानकांमधून हलवले जातील. तेथून हे टँकर्स द्रवरुपी वैद्यकीय ऑक्सिजन टँकर लोड करण्यासाठी विशाखापट्टणम आणि जमशेदपूर, रुरकेला, बोकारो येथे पाठवण्यात येतील.

Maharashtra corona case : महाराष्ट्रात कोरोनाची पस्थितीत आणखी बिकट, मन हेलावणारी मृतांची आकडेवारी!

काही ठिकाणी पुलांवरील रस्ते आणि ओव्हर हेड इक्विपमेंट्सच्या उंचीच्या निर्बंधामुळे विविध आकाराच्या रस्ते टँकर्सपैकी 3320 एमएम उंची असलेले रोड टँकर टी 1618 चे मॉडेल 1290 मिमी उंची असलेल्या फ्लॅट वॅगनवर ठेवता येतील.

राजेश टोपेंनी केली होती मागणी

महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माद्यमातून संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रातील परिस्थिती विषयी माहिती देतांना आरोग्यमंत्री आरोग्यमंत्री टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली.

महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेता अन्य राज्यांतून महाराष्ट्राकडे ऑक्सिजन घेऊन जाणारी वाहने अडविली जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याविषयी केंद्रीय गृहसचिवांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. रस्तेमार्गे ऑक्सिजन वाहतुकीचा कालावधी वाढत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून त्याची वाहतुक करण्यात यावी यासाठी केंद्र शासनाने रेल्वे विभागाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Indian railway, Maharashtra