मराठी बातम्या /बातम्या /देश /

खुशखबर! नवरात्रीच्या काळात ट्रेनमध्ये मिळणार उपवासाचे पदार्थ, अशाप्रकारे ऑर्डर करा ताट

खुशखबर! नवरात्रीच्या काळात ट्रेनमध्ये मिळणार उपवासाचे पदार्थ, अशाप्रकारे ऑर्डर करा ताट

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

Indian Railway: प्लेट मागवण्यासाठी प्रवाशांना 1323 वर कॉल करून ऑर्डर द्यावी लागेल. थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या सीटवर स्वच्छ ताटात जेवण मिळेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

railwatनवी दिल्ली, 26 सप्टेंबर : आजपासून देशभरात शारदीय नवरात्री महोत्सव सुरू झाला आहे. सगळीकडे उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे देखील प्रवाशांची विशेष काळजी घेत आहे. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने प्रवासादरम्यान लोकांना नवरात्रीचे खास खाद्यपदार्थ देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ सीटवर ऑर्डर करता येतील. आयआरसीटीसीच्या या निर्णयामुळे उपवासात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे नवरात्रीच्या काळात ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांना कांदा-लसूण आणि उपवासाच्या मीठात (रॉक सॉल्ट) बनवलेले जेवण दिले जाईल. 400 स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

माहितीनुसार, प्लेट मागवण्यासाठी प्रवाशांना 1323 वर कॉल करून ऑर्डर द्यावी लागेल. थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या सीटवर स्वच्छ ताटात जेवण मिळेल. अशी ऑफरही आयआपसीटीसीने मागच्या वर्षी दिली होती. आयआपसीटीसी पीआरओ आनंद कुमार झा यांनी सांगितले की, नवरात्रीच्या काळात उपवास करणाऱ्या प्रवाशांच्या खाण्यापिण्याची अडचण होते. हे लक्षात घेऊन खास उपवासाच्या थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे. मागणीनुसार ही व्यवस्था पुढे चालू ठेवता येईल.

उपवासाचा मसालाही ताटात मिळेल

उपवासाच्या थाळीमध्ये चार प्रकारच्या श्रेणी उपलब्ध असतील. तुम्ही तुमच्यानुसार यामधून ऑर्डर करू शकाल. पहिल्या प्लेटमध्ये फळे, गव्हाचे पकोडे आणि दही मिळेल, तर दुसऱ्या थाळीत बटाट्याची भाजी, 2 पराठे आणि साबुदाण्याची खीर खायला मिळेल. त्याचप्रमाणे तिसऱ्या थाळीत 4 पराठे, साबुदाणा खिचडी आणि तीन प्रकारच्या भाज्या मिळतील. त्याच वेळी, पनीर पराठे देखील चौथ्या प्लेटमध्ये वॉटर चेस्टनट आणि बटाट्याच्या पराठ्यांसोबत मिळतील, जे तुम्ही ऑर्डर करू शकता. यासोबतच उपवासाचा मसालाही या थाळीत मिळेल.

वाचा - PHOTO: देशात पहिल्यांदाच समुद्राखाली 7 किमी लांबीचा बोगदा बांधणार, हायस्पीडने धावणार बुलेट ट्रेन

चक्क बुलेट ट्रेनपेक्षाही वेगानं धावते भारतीय ट्रेन

सध्या देशभरात वंदे भारत किंवा ट्रेन 18 ची चर्चा जोरात सुरू आहे. कारण या ट्रेनच्या दुसऱ्या पिढीनं टेस्ट रनमध्ये बुलेट ट्रेनलाही मात दिली आहे. वंदे भारतनं अवघ्या 52 सेकंदात 0-100 किमी/तास वेग घेतला. या ट्रेनचा कमाल वेग 180 ते 183 किमी/तास आहे. आता मुद्दा असा आहे की, या ट्रेनच्या इंजिनमध्ये असं काय विशेष आहे की या ट्रेननं इतका वेग पकडला? त्याचबरोबर या ट्रेनच्या तिसर्‍या पिढीमध्ये कोणते मोठे बदल होणार आहेत, हेच आपण जाणून घेणार आहोत.

First published:

Tags: Indian railway, Train