काश्मीरमध्ये 1 हजार फुटांवर ‘केबल’वरून रेल्वे धावणार सुसाट; पाहा थरारक VIDEO

काश्मीरमध्ये 1 हजार फुटांवर ‘केबल’वरून रेल्वे धावणार सुसाट; पाहा थरारक VIDEO

हवा, पाऊस आणि मोठ्या वादळातही हा पूल उत्तम स्थितीत राहू शकणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 28 जुलै: भारतीय रेल्वेने (Indian Railway) आणखी एक इतिहास निर्माण केला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये देशातला पहिलाच रेल्वे केबल पूल तयार होतोय. तब्बल 1 हजार फुटांवर हा पूल तयार होत आहे. हा पूल तयार झाला तर तो देशातल्या इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना ठरणार आहे. कटरा आणि रियासी या दरम्यान हा पूल तयार होत असून उधमपूर-श्रीनगर-बारामूल्ला रेल्वे लिंक योजनेचा भाग आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवर रेल्वे विभागाकडून तयार होणाऱ्या या पूलाबाबत व्हिडीओ शेअर केला आहे. अंजी पूल असं याचं नाव असून त्याची लांबी 473.25 मीटर आहे. तर नदीतल्या खांबांची उंची 331 मीटर म्हणजे 1 हजार फुटांपेक्षाही जास्त आहे. हा पूल केबल्सच्या आधारावर जोडण्यात आलेला आहे. 96 केबल्सच्या आधारावर याची जोडणी झाली असून त्यावरु सुसाट रेल्वे धावू शकणार आहे.

हवा, पाऊस आणि मोठ्या वादळातही हा पूल उत्तम स्थितीत राहू शकणार आहे. जम्मू आणि काश्मीरला देशातल्या इतर राज्यांसोबत जोडण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे.

दहशतवाद्यांचा धोका, प्रतिकूल हवामान, आणि रस्त्यांचा अभाव अशा सर्व परिस्थितीवर आणि अडथळ्यांवरमात करत  रेल्वेने हा पूल तयार केला आहे. त्यासाठी कोकण रेल्वेची मदत घेण्यात आली आहे. हा पूल सुरु झाला तर काश्मीरमध्ये हिवाळ्यातही रेल्वे सेवा सुरळीत राहू शकणार आहे.

त्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत राहणार आहे. त्याचबरोबरसुरक्ष संस्थांनाही त्याचा फायदा होणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 28, 2020, 5:33 PM IST

ताज्या बातम्या