मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनामुळे रेल्वेने घेतला मोठा निर्णय, आता तिकिटावर मिळणार नाही कोणतीही सूट

कोरोनामुळे रेल्वेने घेतला मोठा निर्णय, आता तिकिटावर मिळणार नाही कोणतीही सूट

देशभरामध्ये कोरोनाशी सर्वांचाच लढा सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे.

देशभरामध्ये कोरोनाशी सर्वांचाच लढा सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे.

देशभरामध्ये कोरोनाशी सर्वांचाच लढा सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
नवी दिल्ली,19 मार्च: देशात कोरोना व्हायरसचा (COVID-19) प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री 8 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना कसा करावा, याबाबत देशातील जनतेला आवाहन करणार आहेत. मात्र, आधी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेत होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सर्व कोट्यातील तिकिटांवर मिळणारी सूट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यत्र कोट्यातील कोणत्याही तिकिटावर सूट मिळणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, विद्यार्थी, दिव्यांग नागरिक त्याचप्रमाणे 11 प्रकारच्या रुग्णांना मिळणारी सूट कायम ठेवण्यात आली आहे. हेही वाचा...कोरोनाचा खरा फटका असा बसणार! या कर्मचाऱ्यांचे पगार कमी होण्याचा धोका रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यास मदत होईल. या आधी रेल्वे प्रशासनाने देशभरात एकून 250 रेल्वे स्टेशन्यवर प्लॅटफॉर्म तिकीटाचे मुल्य 10 रुपयांवरुन 50 रुपये करण्यात करण्यात आले होते. रेल्वेने रद्द केल्या 500 हून अधिक गाड्या आज (19 मार्च) अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. विविध कारणांसाठी या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या रद्द झालेल्या रेल्वेंच्या यादीमध्ये एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन्स तसंच काही स्पेशल रेल्वेसेवांचा समावेश आहे. रेल्वेकडून मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे आज एकूण 524 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये जनशताब्दी, सुपरफास्ट ट्रेन, मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर अशा ट्रेन्सचा समावेश आहे. कोरोनामुळे रद्द झाल्या 80 गाड्या देशभरामध्ये कोरोनाशी सर्वांचाच लढा सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे अनेकांनी प्रवास करणं टाळलं आहे. प्रवाशांची कमी झालेली संख्या आणि खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय रेल्वेने बुधवारपर्यंत 80 रेल्वेगाड्या रद्द केल्या होत्या. हजरत निजामुद्दीन ते छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी एक्सप्रेस आणि छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसचाही यामध्ये समावेश आहे. हेही वाचा...'किमान 15 मिनिटं ऊन घ्या व्हायरसचा नाश होईल', कोरोनाबाबत मंत्र्याचा अजब सल्ला घराबाहेर पडण्याआधी तपासून रेल्वेबाबत तपासून घ्या भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रद्द झालेल्या गाड्यांबाबत तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याचप्रमाणे प्रत्येक स्टेशनवर रद्द झालेल्या गाड्यांबाबत आवश्यक तेव्हा अनाउन्समेंट करण्यात येत आहे. प्रवासी 139 या क्रमांकावर मेसेज करून देखील रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांबद्दल माहिती घेऊ शकतात. पूर्ण पैसे परत मिळणार एखाद्या गाडीसाठी तुम्ही रिझर्व्हेशन केले असेल आणि ती गाडी जर रद्द झाली तर तुम्हाल त्याचा पूर्ण रिफंड मिळणार आहे. त्यामुळे जर तुमची गाडी रद्द झाली असेल तर इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी तुम्ही दुसऱ्या ट्रेनचं बुकिंग करू शकतात.
First published:

Tags: Indian railway, Latest news

पुढील बातम्या