शत्रूलाही आता भरणार धडकी, राफेलला लवकरच बसवणार हॅमर मिसाइल

शत्रूलाही आता भरणार धडकी, राफेलला लवकरच बसवणार हॅमर मिसाइल

सप्टेंबर 2020 मध्ये हॅमर क्षेपणास्रासाठी फ्रान्स आणि भारत सरकारमध्ये करार झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर : पूर्व लडाखमधील चीन सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे सैनिक पूर्ण तयारीत असून भारतीय सैन्य आपली ताकद वाढवत आहे. भारतीय सैन्यात नुकतंच राफेल विमान दाखल झालं असून या लढाऊ विमानाबरोबरच त्याच्या क्षमतेतदेखील भर पडणार आहे. राफेलमध्ये लवकरच हॅमर मिसाईल बसवलं जाणार आहे त्यामुळे त्याची क्षमता वाढेल. हॅमर (Hammer) म्हणजेच हाइली एजाइल अँड मॅनोवरेबल म्यूनिशन एक्टेंडेड रेंज हे हवेतून जमिनीवर मारा करणारं मिसाईल आहे.

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, फ्रान्सने भारताच्या राफेल विमानांमध्ये हवेतून जमिनीवर मारा करणारं ऑल वेदर हॅमर मिसाईल बसवण्यास संमती दिली आहे. याआधी राफेलमध्ये हवा आणि जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणारी MICA, Meteor आणि SCALP यांसारखी घातक मिसाईल्स बसवण्यात आली होती. हॅमरच्या आधी यामध्ये असणारं 300 किलोमीटर मारक क्षमता असणारं स्कॅल्प मिसाइल या विमानांना ताकदवान बनवत होतं. त्याचबरोबर Meteor मिसाईल हवेतून हवेत मारा करण्यासाठी सक्षम आहे तर MICA शत्रूंचे मनोबल खच्ची करण्यात उपयुक्त आहे.

हे वाचा-US Election 2020 : काय आहे रोबोकॉल ज्यानं वाढवली ट्रम्प आणि बायडन यांची चिंता

खूपच घातक आहे हॅमर

रिपोर्टनुसार, हॅमर खूपच घातक मिसाईल आहे. ते विनाजीपीएस 70 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.

गोल्डन एरो स्क्वाड्रनला सर्वात आधी मिळणार मिसाइल

सप्टेंबर 2020 मध्ये हॅमर क्षेपणास्रासाठी फ्रान्स आणि भारत सरकारमध्ये करार झाला आहे. त्याचबरोबर या महिन्याच्या अखेरपर्यंत अंबालामधील भारतीय वायू सेनेच्या गोल्डन अरो स्क्वाड्रनला हस्तांतरित केलं जाणार आहेत. भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये झालेल्या करारानुसार ही मिसाइल एका वर्षाच्या आत भारतीय सैन्याला द्यायची होती. परंतु नवी दिल्लीतील तात्काळ गरजेमुळे त्यांनी ही हत्यारे लवकर देण्याचा निर्णय घेतला.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 6, 2020, 10:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading