मराठी बातम्या /बातम्या /देश /दोन्ही पाय नसूनही गगनभरारी, उर्जा देणाऱ्या दिव्यांग अबुची वाचा शौर्यगाथा

दोन्ही पाय नसूनही गगनभरारी, उर्जा देणाऱ्या दिव्यांग अबुची वाचा शौर्यगाथा

यूपीची राजधानी लखनौ येथील रहिवासी असलेल्या अबू हुबैदाहची कहाणी सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.

यूपीची राजधानी लखनौ येथील रहिवासी असलेल्या अबू हुबैदाहची कहाणी सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.

यूपीची राजधानी लखनौ येथील रहिवासी असलेल्या अबू हुबैदाहची कहाणी सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

अंजली सिंग राजपूत (लखनौ), 25 मार्च : यूपीची राजधानी लखनौ येथील रहिवासी असलेल्या अबू हुबैदाहची कहाणी सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओमुळे दोन्ही पाय कायमचे गमावलेल्या अबुने क्रांती घडवली आहे. ज्यावेळी त्याच्यावर अपंगत्वाची वेळी आली त्यावेळी त्याला नातेवाईकांनी वाईट पद्धतीने हिणवलं होतं.

परंतु अबू हुबैदाह हार मानेल तो कसली मुलगा? त्याने जिद्दीच्या जोरावर पॅरा बॅडमिंटनपटू बनून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्यासह देशाचं नाव मोठं केलं आहे. त्याने सुवर्ण पदकांसह अनेक पदके जिंकली आहे. एवढेच नाही तर उत्तर प्रदेशचा सर्वोच्च पुरस्कारही त्याने मिळवला आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी 'सायकल बँक' ठरली वरदान, पाहा कसा झाला बदल!

2021 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू हुबैदाहला उत्कृष्ट कामगिरीसाठी लक्ष्मण पुरस्कार दिला होता. डॉ. शकुंतला मिश्रा पुनर्वसन विद्यापीठ, मोहन रोड येथे सुरू असलेल्या 5 व्या राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या अबू हुबैदाहने न्यूज18 लोकलशी खास संवाद साधला.

यावेळी तो म्हणाला की, द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित आमचे गुरू गौरव खन्ना यांनी मला ठिकाणी येण्यापर्यंत मदत केली. मी त्यांच्यामुळे जागतिक क्रमवारीत 6 व्या स्थानावर आहे. लखनौ विद्यापीठातून बी.कॉम केल्यानंतर आपले शिक्षण सोडून पॅरा बॅडमिंटनवर पूर्ण लक्ष केंद्रित केले. वडील मोहम्मद कमर आरोग्य केंद्रात शिपाई आहेत आणि आई नफिसा बानो घरकाम करते या दोघांनी त्यांना नेहमी प्रोत्साहन दिले आहे.

अबू पुढे म्हणाला की, जेव्हा माझा भाऊ क्रिकेटमध्ये अनेक पदके घेऊन घरी यायचा यावेळी त्याचे पदके पाहून उत्साह व्हायचा. यावेळी मी ठरवलं की एक दिवस आपल्यालाही आपल्या नावावर पदके मिळवायची आहेत.

यानंतर त्याने पदकांची लयलूट करत 2009 साली पहिले पदक मिळवले. त्याच वेळी, जेव्हा त्याने 2017 मध्ये देशासाठी आंतरराष्ट्रीय पदक जिंकले तेव्हा मला खूप अभिमान वाटला असल्याचे तो म्हणाला.

मोलमजुरी करून आई करते सांभाळ, पृथ्वीराज अनुभवणार इस्रोचं विश्व, Video

28 वर्षीय अबू हुबैदाह यांना दोन मुली आहेत. ऑलिम्पिकमध्ये पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकून आपल्या देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे आपले ध्येय असल्याचे तो सांगतो. यासोबतच अबू हुबैदाहने सांगितले की, जर कोणी अपंग व्यक्ती असेल आणि लोक त्याला टोमणे मारत असतील तर त्या लोकांना तुमचे शत्रू न मानता तुमचे मित्र समजा. अशी माणसे आयुष्यात नसतील तर पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार नाही.

First published:
top videos

    Tags: Local18, Success story, Uttar pradesh