पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज बदलणार

पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज बदलणार

सोन्या-चांदीच्या दराप्रमाणेच आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही दररोज बदलणार आहेत. येत्या 16 जूनपासून देशभरात या निर्णयाची पेट्रोलियम कंपन्या अंमलबजावणी करणार आहे.

  • Share this:

08 जून : सोन्या-चांदीच्या दराप्रमाणेच आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही दररोज बदलणार आहेत. येत्या 16 जूनपासून देशभरात या निर्णयाची पेट्रोलियम कंपन्या अंमलबजावणी करणार आहे.

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांनी या मोहिमेत भाग घेतलाय. त्यामुळे दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणार बदल सर्वसामान्य जनतेला कळणार आहे.

इंडियन पेट्रोलियम कंपनीने याधी पायलट तत्वावर देशातील पाच शहरांमध्ये या प्रयोगाला सुरुवात केली होती. 1 मेपासून विशाखापट्टणम्, उदयपूर, जमशेदपूर आणि चंदीगडमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात बदलाबाबत माहिती दिली जातेय.

एवढंच नाहीतर पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल आणि डिझेल घरपोच (होम डिलिव्हरी) पोहचवण्याचाही विचार करतेय. जर यात यश मिळालं तर देशभरात हा प्रयोग केला जाणार आहे.

सध्या इंधनाच्या दरात दर महिन्याच्या 15 तारीख आणि अखेरच्या तारखेला बदल होत असतो.

First published: June 8, 2017, 6:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading