इंडियन ऑइल आणि होम मेकॅनिक यांनी एकत्रितपणे सुरू केला अनोखा उपक्रम, तुमच्या दारात देणार सुविधा

इंडियन ऑइल आणि होम मेकॅनिक यांनी एकत्रितपणे सुरू केला अनोखा उपक्रम, तुमच्या दारात देणार सुविधा

होम मेकॅनिक IND असं या सुविधेचं नाव आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : भारतातील प्रमुख तेल कंपन्यापैकी एक असलेली इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड दिल्लीतील होम मेकॅनिक कंपनीबरोबर भागीदारी करून दिल्लीत एक नवीन सुविधा सुरू करत आहे. होम मेकॅनिक IND असं या सुविधेचं नाव असून ही दिल्लीत दारोदार जाऊन कार सर्व्हिसिंगची सुविधा देण्यात येणार आहे. दिल्लीनंतर मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये ही सुविधा चालू करण्याचा त्यांचा विचार आहे.

या मोबाईल गॅरेज सर्व्हिस व्हॅनमध्ये कार दुरुस्त करण्यासाठी व कार सर्व्हिस करण्यासाठी आवश्यक सर्व सोयी आहेत. ज्यात पॉवर जनरेटर, एअर कॉम्प्रेसर, ऑइल डिस्पेंसर, वेस्ट ओईल कलेक्टर, व्हॅक्युम क्लिनर, वॉशिंग इक्विपमेंट यांचा समावेश आहे. रेग्युलर वर्कशॉपमध्ये असणाऱ्या इतर मशीनसुद्धा या गाडीत असणार आहेत. अशी पहिली मोबाइल व्हॅन दिल्लीतील पंचशील एन्क्लेव येथील इंडियन ऑइलच्या पंपावर सेवा देत आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की ते ग्राहकांच्या दारात जाऊन 300 पेक्षा जास्त प्रकारच्या कारच्या दुरुस्तीची सेवा पुरवणार आहेत. त्यांना फक्त home-machanic.in च्या वेबसाईटवर किंवा व्हॉट्सॲप हेल्पलाइन नंबर 9859864141 वर अपॉईंटमेंट बुक करणे आवश्यक आहे. ग्राहकांना आपल्या गाडीचा नंबर, मॉडेल तसे ती गाडी कुठल्या वर्षातली आहे या सगळ्या गोष्टी बुकिंग सोबत सांगणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या गाडीत झालेल्या बिघाडानुसार कंपनीकडून तुम्हाला किती खर्च होईल याचा अंदाज देण्यात येणार आहे. ग्राहकाने खर्चाचा अंदाज मान्य केल्यानंतर कंपनीद्वारे ग्राहकांच्या दारात एकूण तीन सदस्य पाठवण्यात येणार आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

हे ही वाचा-87 व्या वर्षीही सायकल चालवत अनवाणी फिरून दारोदारी देतात रुग्णसेवा

होम मेकॅनिक ही पहिली अशी कंपनी आहे जिने 300 पेक्षा अधिक गाड्यांची दुरुस्ती आणि सर्विस ग्राहकांच्या दारात जाऊन देणारी सेवा सुरू केली आहे. होम मेकॅनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल आर म्हणाले की, हायटेक उपकरणांचा वापर करून आम्ही अशा काही गोष्टी तयार केल्या आहेत ज्याच्यातून दुरुस्तीचं 90% काम हे ग्राहकांच्या दारातच करता येऊ शकते. ते म्हणाले की इंडियन ऑइलसोबत भागीदारी केल्यामुळे आमची क्षमतासुद्धा वाढेल आणि जास्तीत जास्त ग्राहक सुद्धा आम्हाला मिळतील. देशभरात इंडियन ऑइलचे 30 हजारांहून अधिक इंधन पंप आहेत. सध्या covid-19 साथीच्या आजारांमुळे बरेच लोक घरबसल्या सुविधा मिळावी या विचारात आहेत. म्हणूनच इंडियन ऑइल आणि होम मेकॅनिक यांनी एकत्र येऊन ही सुविधा सुरू करण्याचा विचार केला. जेणेकरून गाडी दुरुस्तीसाठी एकमेकांच्या संपर्कात येण्याची किंवा बाहेर जाण्याची गरज नाही. या व्हॅनमधून तीन लोक येऊन तुमच्या दारातच तुमची गाडी दुरुस्त करून देऊ शकतात. या सुविधेद्वारे ग्राहकांकडून कंपनीला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 23, 2020, 10:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या