वीरांगना…नौदलात घडला इतिहासात, पहिल्यांदाच 3 महिला पायलट; VIDEO पाहून कराल सलाम!

वीरांगना…नौदलात घडला इतिहासात, पहिल्यांदाच 3 महिला पायलट; VIDEO पाहून कराल सलाम!

लष्कराच्या तीनही विभागात सुरूवातीला फक्त पुरुषांचं वर्चस्व होतं. हळूहळू महिला आता महत्त्वाच्या पोस्टवरही नियुक्त होत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 22 ऑक्टोबर: भारतीय लष्कर (Indian Army) आणि हवाईदलात  (Indian Air Force) आता महिलांचा पराक्रम नवा नाही. त्यानंतर आता नौदलातही गुरुवारी इतिहास घडला. नौदलाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच 3 महिला पायलटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नौदलामध्येही आघाडीवर महिलासांठी कवाडे मोकळी झाली आहेत. लेफ्टनंट दिव्या शर्मा, लेफ्टनंट शुभांगी स्वरूप आणि लेफ्टनंट शिवांगी या तीन नवदुर्गा आता नौदलात आपला पराक्रम दाखविण्यासाठी सिद्ध झाल्या आहेत.

27व्या डॉर्निअर ऑपरेशनल फ्लाइंग ट्रेनिंग (डीओएफटी) कोर्समध्ये असलेल्या 6 जणांच्यी पथकात या तिघींची निवड करण्यात आली आहे. INS गरूडवर झालेल्या एका कार्यक्रमात या तिघींना पाटलट म्हणून निवडल्याचं प्रमाण देण्यात आलं.

दिव्या शर्मा ही नवी दिल्लीची राहणारी आहे, शुभांगी स्वरूप उत्तर प्रदेश आणि शिवांगी बिहारची राहणारी आहे.

सुरुवातीला या तिघीही नौदलाच्या टेहाळणी करणाऱ्या हेलिकॉप्टरचं सारथ्य करणार आहे. नौदलाच्या दैनंदिन कामात या टेहाळणीला अतिशय महत्त्व आहे. आपल्या समुद्री हद्दीत नेमकं कोण प्रवेश करतंय. काय हालचाली सुरू आहेत असं अत्यंत महत्त्वाचं काम त्यांना पार पाडावं लागणार आहे.

त्याचबरोबर अपघात किंवा संकट काळातही बचाव कार्यात सहभागी व्हावं लागणार आहे.

लष्कराच्या तीनही विभागात सुरूवातीला फक्त पुरुषांचं वर्चस्व होतं. हळूहळू महिला आता महत्त्वाच्या पोस्टवरही नियुक्त होत आहेत. लष्करातल्या महिलांच्या नियुक्त्यांबाबतचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टातही गेलं होतं. सुरुवातीच्या काळात कडक शिस्तीचे लष्करी अधिकारी महिलांच्या प्रवेशाबद्दल फारसे उत्सुक नव्हते. नंतर मात्र त्यांचं मतपरिवर्तन करण्यात आलं.

आता अनेक आघाड्यांवरही महिलांची नियुक्ती करण्यास मुभा आहे. महिलांच्या शारीरिक क्षमतेबद्दल सुरुवातीला शंका घेतली जात होती. लष्करात आघाडीवर अतिशय खडतर परिस्थितीत त्या काम करू शकतील का याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र नंतर सर्वच आघाड्यांवर महिलांनी त्यांचं कतृत्व सिद्ध करून दाखवल्याने अनेक  ऐतिहासिक बदल घ्यावे लगाले आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 22, 2020, 6:34 PM IST

ताज्या बातम्या