मराठी बातम्या /बातम्या /देश /भारतीय नौदलाच्या ताफ्यात नव्यानं दाखल होणाऱ्या 'INS Vela' ची काय आहे खासियत

भारतीय नौदलाच्या ताफ्यात नव्यानं दाखल होणाऱ्या 'INS Vela' ची काय आहे खासियत

या सर्व पाणबुड्या फ्रेंच स्कॉर्पियन क्लास ( French Scorpion class) पाणबुडी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आल्या आहेत. त्या सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि आधुनिक युद्धतंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

या सर्व पाणबुड्या फ्रेंच स्कॉर्पियन क्लास ( French Scorpion class) पाणबुडी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आल्या आहेत. त्या सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि आधुनिक युद्धतंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

या सर्व पाणबुड्या फ्रेंच स्कॉर्पियन क्लास ( French Scorpion class) पाणबुडी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आल्या आहेत. त्या सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि आधुनिक युद्धतंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

मुंबई, 25 नोव्हेंबर:   भारतीय नौदलाची ( Indian Navy) ताकद आणखी वाढणार आहे. कारण आज, गुरुवारी (25 नोव्हेंबर) ‘आयएनएस वेला’ (INS Vela) ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. मुंबईतल्या माझगाव डॉकयार्ड ( Mazagon Dockyard) येथे नेव्हल ग्रुप, फ्रान्सच्या ( Naval Group, France) सहकार्याने ही पाणबुडी ( submarine) तयार करण्यात आली आहे. ही पाणबुडी 9 नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. याआधी आयएनएस कलवरी, खांदेरी, करंज या पाणबुड्याही भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत. या सर्व पाणबुड्या फ्रेंच स्कॉर्पियन क्लास ( French Scorpion class) पाणबुडी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आल्या आहेत. त्या सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि आधुनिक युद्धतंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

याबाबत एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना आयएनएस वेलाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन अनीस मॅथ्यू म्हणाले, की 'ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या पाणबुडीमध्ये स्वदेशी बॅटरी आणि अॅडव्हान्स कम्युनिकेशन सेट आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या कल्पनेला प्रोत्साहन मिळतं.'

आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज

आयएनएस वेला या पाणबुडीची लांबी 75 मीटर आणि वजन 1615 टन आहे. या पाणबुडीवर एका वेळी 35 खलाशी (नौसैनिक) आणि 8 अधिकारी तैनात केले जाऊ शकतात. वेला पाणबुडी समुद्राखाली 37 किमी वेगाने धावू शकते. तळ सोडल्यानंतर आयएनएस वेला 2 महिने समुद्रात राहू शकते.

हेही वाचा-   Terrorist Active: खोऱ्यात 199 दहशतवादी सक्रिय, यावर्षी 151 दहशतवाद्यांचा खात्मा

 नौदलाच्या गरजा लक्षात घेऊन या पाणबुडीमध्ये युद्धसामग्री बसवण्यात आली आहे. समुद्राखाली असतानाही ती क्षेपणास्त्राने शत्रूच्या पाणबुड्या आणि जहाजं नष्ट करू शकते. वेला पाणबुडीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी क्षेपणास्त्रंदेखील आहेत, ज्यामध्ये हवेत उडणाऱ्या शत्रूच्या विमानांवर पाण्याखालून मारा करण्याची ताकद आहे.

भारतीय नौदलात आयएनएस वेला समाविष्ट झाल्यानंतर पाणबुड्यांची एकूण संख्या 17 होईल. तसंच नौदल स्वतःची ताकद वाढवण्यासाठी येत्या काही वर्षांत आपल्या ताफ्यात आणखी पाणबुड्या समाविष्ट करून घेण्याच्या योजनेवर काम करत आहे.

हेही वाचा-  1700 कोटींची संपत्ती असलेला कोण आहे 'हा' काँग्रेसचा उमेदवार

 भारतीय नौदल सातत्याने आपली ताकद वाढवत आहे. त्यासाठी सातत्याने नौदल आपल्या ताफ्यामध्ये विविध पाणबुड्या समाविष्ट करून घेत असते. नौदलात आयएनएस विशाखापट्टणमच्या समावेशामुळे समुद्रातली भारताची ताकद वाढली आहे. त्यातच आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस वेला ही पाणबुडीही समाविष्ट होत आहे. त्यामुळे आता भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे.

First published:

Tags: Indian navy