पुलवामा हल्ल्यानंतर 'नौदल'ही होतं पाकिस्तानवर हल्ल्याच्या तयारीत

पुलवामा हल्ल्यानंतर 'नौदल'ही होतं पाकिस्तानवर हल्ल्याच्या तयारीत

बालोकटच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या अत्याधुनिक ऑगस्टा क्लास श्रेणीतली पानबुडी गायब गेली होती. ही पानबुडी भारताच्या नौदलाला ट्रेस होत नसल्याने भारताची चिंता वाढली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जून :  पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून भारताने पाकिस्तानला धडा शिकवला होता. त्यानंतर पाकिस्तानने समुद्र मार्गाने काही आगळीक करू नये म्हणून भारताने नौदलाला सज्ज ठेवलं होतं. काही घडल्यास भारत हल्ल्याच्याही तयारीत होता अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिलीय. याच दरम्यान पाकिस्तानची एक पानबुडी बेपत्ता असल्याची माहिती नौदलाला मिळाली होती. मात्र नंतर तिचा छडा लागल्याने नौदलाला दिलासा मिळाला.

बालोकटच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या अत्याधुनिक ऑगस्टा क्लास श्रेणीतली पानबुडी गायब गेली होती. ही पानबुडी भारताच्या नौदलाला ट्रेस होत नसल्याने भारताची चिंता वाढली होती. ही पानबुडी भारताच्या दिशेने  निघाली का याचीही शक्यता पडताळून पाहिली जात होती. त्यामुळे भारताने युद्ध सराव थांबवत आपल्या महत्त्वाच्या युद्धनौका पाकिस्तानच्या सीमेवर तैनात केल्या होत्या.

भारत समुद्री मार्गानेही पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या तयारीत होता. पाकिस्तानची पानबुडी कुठे आहे याचा छडा लावण्याचा भारतीय गुप्तचर संस्था प्रयत्न करत होत्या. अखेर ती पानबुडी कराचीजवळ असल्याची माहिती भारतीय गुप्तचर सूत्रांना मिळाली त्यानंतर भारताने संयम दाखवत हल्ल्याची योजना स्थगित केली.

भारताच्या पानबुडीने पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला अशीही ओरड पाकने केली होती. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप खोडसाळपणाचे आहे हे दाखवून दिले.

पाकस्तानला वाटते अजुनही हवाई हल्ल्याची भीती

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईक(Air Strike)नंतर पाकिस्तान (Pakistan) अद्याप सावरलेला दिसत नाही. पाकिस्तानमधील इमरान खान सरकारने अद्याप भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र खुले केले नाही. त्यामुळे भारतात येणारी किंवा भारतातून जाणाऱ्या विमानांना अधिक लांबचा प्रवास करून जावे लागते. हवाई क्षेत्र खुले करण्यासंदर्भात आता पाकिस्तानने भारतापुढे विनंती वजा अट ठेवली आहे. ही अट मान्य केली तरच आम्ही तुम्हाला हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी देऊ असे पाकिस्तानने म्हटले आहे.

काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. या स्ट्राईकनंतर पाकिस्तानने त्यांचे पूर्व भागातील हवाई क्षेत्र भारतासाठी बंद केले होते. आता इमरान खान सरकारने भारताला हवाई क्षेत्र खुले करण्याची तयारी दाखवली आहे. पण त्याबदल्यात त्यांना भारताकडून एक आश्वासन हवं आहे. जर भारत पुन्हा एअर स्ट्राईक करणार नाही याची हमी देत असेल तर हवाई क्षेत्र खुले करण्यात येईल.

पाकिस्तानने हवाई क्षेत्र वापरण्यावर 28 जूनपर्यंत बंदी घातली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान तोपर्यंत हवाई क्षेत्र भारतासाठी खुले करणार नाही जोपर्यंत भारत एअर स्ट्राईक न करण्याचे आश्वासन देत नाही. पाकिस्तानने 26 फेब्रुवारी रोजी ही बंदी घातली होती. 14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 40हून अधिक जवाना शहिद झाले होते. त्यानंतर भारताने 12 दिवसांनी एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्यात अनेक दहशतवादी तल नष्ट करण्यात आले होते. तेव्हापासून पाकने हवाई क्षेत्र वापरण्यावर बंदी घातली होती.

First published: June 23, 2019, 5:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading