नौदलात हेरगिरी? शिप आणि नेव्ही एअरबेसवर Smart phone वापरावर बंदी

नौदलात हेरगिरी? शिप आणि नेव्ही एअरबेसवर Smart phone वापरावर बंदी

सोशल मीडियाच्या (Social Media) वापरावरह बंदी घालण्यात आली आहे.

  • Share this:

संदीप बोल,(प्रतिनिधी)

नवी दिल्ली, 30 डिसेंबर: भारतीय नौदलाने (Indian navy) शिप आणि नेव्ही एअरबेसवर स्मार्टफोनच्या (Smart phone) वापरावर बंदी घातली आहे. या संदर्भात सर्व जवान आणि अधिकाऱ्यानी सूचना देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियाच्या (Social Media) वापरावरह बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर शिप आणि नेव्ही एअरबेसवर स्मार्ट फोन (Smart Phone) न आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी 7 जणांना नौदलाने हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान हेरगिरी करण्याचा या सात जणांवर आरोप ठेवण्यात आला आहे.

नौदलात हेरगिरीचा भंडाफोड..

मागील काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी एका हेरगिरी करणाऱ्या रॅकेटचा (Espionage Racket)भंडाफोड केला होता. भारतीय नौदलाच्या सात जवानांना अटक केली होती. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले आरोपी पाकिस्‍तानशी संबंधित आहेत. याशिवाय पोलिसांनी अनेक जवानांवर संशय असून त्यांचीही चौकशी सुरू आहे.

ऑपरेशन डॉल्फिन्स नोज

आंध्र प्रदेश पोलिसांनी सांगितले की, पोलिसांची गुप्तचर शाखेने केन्द्रीय गुप्तचर संस्था आणि नौदलाच्या मदतीने ही कारवाई केली आहे. 'ऑपरेशन डॉल्फिन्स नोज' असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे. या मोहिमेतंर्गत पोलिसांनी नौदलातील हेरगिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. नौदलाच्या 7 कर्मचाऱ्यांना आणि एक हवाला ऑपरेटरला देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2019 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading