News18 Lokmat

भारतीय जवान नव्हे तर 'देवदूत', बातमी वाचून अभिमानाने तुमची मान उंचावेल!

भारतीय नौदलाने अशी कामगिरी केली आहे. ज्याबदद्ल वाचून अभिमानाने तुमची मान नक्की उंचावेल.

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 07:06 AM IST

भारतीय जवान नव्हे तर 'देवदूत', बातमी वाचून अभिमानाने तुमची मान उंचावेल!

नवी दिल्ली, 25 मार्च: सीमा असो अथवा हवाई किंवा समुद्र मार्ग देशाच्या रक्षणासाठी लष्कर नेहमीच एक पाऊल पुढे असते. पण केवळ देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी नाही तर एखाद्या नैसर्गिक आपत्तीवेळी देखील भारतीय जवान आघाडीवर असतात. पुर असो की चक्रीवादळ अशा वेळी भारतीय नौदल जीवाची बाजी लावून नागरिकांची मदत करत असते. पण भारतीय नौदलाने अशी कामगिरी केली आहे. ज्याबदद्ल वाचून अभिमानाने तुमची मान नक्की उंचावेल.

आफ्रिका खंडातील मोझांबिक देश चक्रीवादळामुळे मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत आहे. संकटात सापडलेल्या मोझांबिकच्या मदतीला भारतीय नौदल धावून गेले. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या मोझांबिकमधील अनेक भागात अडकलेल्या लोकांना भारतीय नौदलाने वाचवले. भारतीय नौदलाने मोझांबिकमधील 192 जणांनाचे प्राण वाचवले. इतकच नव्हे तर 1 हजार 381 लोकांना वैद्यकीय व अन्य मदत पोहोचवली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नौदलाच्या या कामगिरीची माहिती दिली आहे.

मोझांबिकने भारताकडे मदत मागितली होती.त्यानंतर तातडीने भारताने बीरा बंदराकडे भारताने 3 नौका पाठवल्या व मदत आणि बचाव कार्य सुरु केले.मोझांबिकच्या आतापर्यंत भारतीय जवानांनी 192 अधिक लोकांची प्राण वाचवले आहेत. त्याच बरोबर चक्रीवादळात अडकेल्या 36 भारतीयांची देखील सुटका केली आहे. चक्रीवादळाचा तडाका बीरा शहराला बसला आहे. तसेच सोफाला प्रांताची राजधानीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या शहरातील विद्युत पुरवठा बंद झाला असून वादळामुळे रस्ते वाहून गेले आहेत. विमानतळ देखील बंद करण्यात आल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.Loading...


आफ्रिका खंडातील सर्वात गरीब देश असलेल्या मोझांबिकला चक्रीवादळामुळे मोठा फटका बसला आहे. देशातील मोठ्या भागावर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या शुक्रवारी आलेल्या या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस देखील पडला होता.

हजारो किलोमीटर लांब असेल्या आणि नैसर्गिक व भौगोलिक माहिती नसताना देखील भारतीय जवानांनी मोझांबिकमध्ये मोठे शौर्य गाजवले आहे.


3 दहशतवाद्यांना पोलिसांनी केली अटक, पहिल्यांदा समोर आला LIVE VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 07:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...